ETV Bharat / state

कोल्हापूरमध्ये ५७ इमारती धोकादायक स्थितीत; महापालिकेकडून कारवाईची प्रतीक्षा

author img

By

Published : Aug 26, 2020, 8:52 PM IST

कोल्हापूर शहरात सद्यस्थितीत ५७ इमारती धोकादायक स्थितीत आहेत. महापालिकेकडून मिळकतधारकांना इमारती खाली करण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, काही जण याप्रकरणी न्यायालयात गेले आहेत. धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी महापालिकेने धडक कारवाई करण्याची गरज असून नागरिक पालिकेच्या कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत.

dangerous buildings in kolhapur
कोल्हापूरमधील धोकादायक इमारती

कोल्हापूर- महाड येथील ५ मजली इमारत कोसळून १६ जणांना जीव गमवावा लागला. यामुळे कोल्हापूर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. सध्या शहरातील ५७ धोकादायक इमारतींमुळे सर्वसामान्य जनतेला जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. महापालिका केवळ नोटिसा काढण्याचे काम करते. मात्र,कठोर भूमिका घेण्याचे धाडस दाखवत नसल्याचे चित्र आहे. महाड दुर्घटनेसारखी दुर्दैवी वेळ कोल्हापूरकरांवर येण्याची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का?, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

कोल्हापूरमध्येही धोकादायक इमारतींचा प्रश्न

कोल्हापूर शहरात जुन्या इमारतींची संख्या मोठी आहे. तीन वर्षांंपूर्वी केलेल्या सव्‍‌र्हेत ९० इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. ही आकडेवारी पूर्वीपेक्षा अधिक होती. यावर्षी धोकादायक इमारतींची संख्या ५७ इतकी आहे. प्रशासनाकडून पावसाळा आला की धोकादायक बांधकामे काढून घ्यावीत, अशा नोटीस महापालिकेकडून देण्यात येतात. मात्र, महापालिकेकडून प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचे दिसून येते.

शहरातील सर्व ९० धोकादायक इमारतींच्या मिळकतधारकांना नोटिसाही बजावल्या गेल्या आहेत. त्यातील ३३ इमारती उतरवून घेतल्या आहेत. तर उर्वरित ५७ इमारती तशाच आहेत. बरेच मिळकतधारक न्यायालयात जात असल्याने प्रशासनाच्या कारवाईत अडथळा येतो. पालिका प्रशासन धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यावर न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवली जावी यासाठी प्रयत्न करत आहे. कोणाला कसलाही धोका पोहोचू नये याची काळजी घेतली जात आहे, असे महापालिकेच्या अधिकारी वर्गाकडून सांगितले जाते.

धोकादायक इमारती पाडण्याची कारवाई कधी केली जाणार हा प्रश्न आहे. पालिकेच्या नोटीसला मिळकतधारकांकडून अल्प प्रतिसाद दिला जातो. अनेक नागरिक जीव मुठीत घेऊन धोकादायक आणि जीर्ण इमारतीमध्ये वास्तव्य करतात तर काही जणांकडून बिनदिक्कत व्यवसाय केले जातात. व्यावसायिकांचा परवाना रद्द करणे शक्य असतानाही त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर २२ इमारती धोकादायक आहेत. विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी बैठक घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे गणेश विसर्जन मिरवणूक होणार नाही. पुढील वर्षापर्यंत मिरवणूक मार्गातील धोकादायक इमारती हटवण्याची कारवाई महापालिकेने करणे गरजेचे आहे. मिरवणूक मार्गवार नेहमीच खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ असते. महाड सारखी दुर्घटना घडल्यास अनेकांच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे महापालिकेने कठोर भूमिका घेणे महत्वाचे आहे. शहरात अनेक ठिकाणी धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी लक्ष घालून धोकादायक इमारती हटवण्यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे धोकादायक इमारतीत वास्तव्य

कोल्हापूर महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांसाठी संभाजीनगरमध्ये घरकुल योजना राबवली आहे. १०० पेक्षा जास्त कुटुंब यामध्ये वास्तव्यास आहेत. ही इमारत जीर्ण झाली असून त्यावर झाडे उगवली आहेत. इमारतीमध्ये गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. इमारत धोकादायक बनली असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याचा अटीवर सांगितले.

महापालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या संभाजीनगर येथील इमारतीचे ऑडिट करुन तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची गरज आहे, असे जिल्हा आपत्ती प्राधिकरण समितीचे सदस्य अशोक रोकडे यांनी सांगितले. धोकादायक इमारतीत अनेकजण वास्तव्य करत आहेत. त्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. पण इमारत सोडण्यास अनेकजण तयार नाहीत. संभाजीनगर जवळील धोकादायक इमारत हटवण्यासाठी इस्टेट विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे, असे शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.