ETV Bharat / state

कोल्हापुरातील शेतकऱ्याचे अनोखे ट्रॅक्टर प्रेम; ज्याच्यामुळे घरात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले त्याचा केक कापून वाढदिवस साजरा

author img

By

Published : Aug 10, 2021, 3:20 PM IST

Updated : Aug 10, 2021, 3:31 PM IST

आपण सर्वजणच आपापले वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करतो. काहीजण आपल्या जनावरांचे तर काही जण झाडांचे सुद्धा वाढदिवस साजरे करू लागले आहेत. मात्र कोल्हापुरातील राधानगरीमधील कौलव गावात एका शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टरचाच वाढदिवस साजरा केला आहे. ट्रॅक्टरला फुगे बांधून, अगदी सजवून कुटुंब आणि गल्लीतील मित्रांच्या उपस्थितीत केक कापून ट्रॅक्टरचा वाढदिवस साजरा केला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

कोल्हापूर - आपण सर्वजणच आपापले वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करतो. काहीजण आपल्या जनावरांचे तर काही जण झाडांचे सुद्धा वाढदिवस साजरे करू लागले आहेत. मात्र कोल्हापुरातील राधानगरीमधील कौलव गावात एका शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टरचाच वाढदिवस साजरा केला आहे. ट्रॅक्टरला फुगे बांधून, अगदी सजवून कुटुंब आणि गल्लीतील मित्रांच्या उपस्थितीत केक कापून ट्रॅक्टरचा वाढदिवस साजरा केला आहे.

शेतकऱ्याने केला ट्रॅक्टरचा वाढदिवस साजरा

राधानगरी तालुक्यातील कृष्णात पाटील यांचे ट्रॅक्टर प्रेम

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव एक सदन गाव. गावात अनेकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. याच गावात कृष्णात धोंडीराम (आबा) पाटील ज्यांना सर्वजण 'घुंगरू' म्हणतात. त्यांचा गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ट्रॅक्टर हेच मुख्य उत्पन्नाचे साधन. स्वतःच्या शेतीच्या कामासोबतच गावातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीची कामही ते गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. ट्रॅक्टरमुळेच त्यांनी आजपर्यंत आपले घर चालवले आहे. ज्या ट्रॅक्टरमुळे आपली आर्थिक परिस्थिती उत्तम झाली त्या ट्रॅक्टरवरच प्रेम नसेल तर ते थोडे चुकीचे ठरले. मात्र, त्यांनी आपल्या ट्रॅक्टरवर किती प्रेम आहे हे 9 ऑगस्टला दाखवून दिले असून ज्याच्यामुळे घरात भरभराट होते त्या ट्रॅक्टरचा चक्क वाढदिवसच त्यांनी साजरा केला आहे. ट्रॅक्टरला फुगे बांधून, अगदी सजवून कुटुंब आणि गल्लीतील मित्रांच्या उपस्थितीत केक कापून त्यांनी आपल्या ट्रॅक्टरचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांच्या या अनोख्या ट्रॅक्टर प्रेमाची सद्या राधानगरी तालुक्यात चर्चा सुरू आहे.

जुन्या ट्रॅक्टरमधून शरद पवार यांची मिरवणूक

तालुक्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत दादासाहेब कृष्णराव पाटील कौलवकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटनावेळी शरद पवार कौलव गावात आले होते. यावेळी त्यांची आपल्या जुन्या ट्रॅक्टरमधून पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. ही आठवणही कृष्णात पाटील नेहमी बोलून दाखवतात.

हेही वाचा - कोल्हापुरातील शिरोळमध्ये पूरग्रस्तांचा आक्रोश; 52 गावातील ग्रामस्थांची तहसील कार्यालयावर धडक

Last Updated : Aug 10, 2021, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.