कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील शिरढोन येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तुकाराम रामू माने (वय 62), असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या आत्महत्येची कुरुंदवाड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीने भाजपच्या जाळ्यात फसू नये - राजू शेट्टी
याबाबत अधिक माहिती अशी की, तुकाराम रामू माने हे घरातील कर्ताप्रमुख होते. सोमवारी सकाळी त्यांनी गोठ्यातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या शेतातील पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माने यांच्यावर स्थानिक सोसायटी आणि इतर लोकांकडून घेतलेले कर्ज होते. या कर्जाच्या चिंतेने माने यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती विश्वास बालिघाटे यांनी दिली.