ETV Bharat / state

प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणतात कोल्हापूरचा 'नादच खुळा'; कारण माहितेय का? - कोल्हापूर फॅन्सी नंबर

अगदी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस यांनी सुद्धा 'नाद खुळा' कोल्हापूर म्हणत कौतुक केले आहे. लॉकडाऊन काळात किती जणांनी आपल्या आवडीच्या नंबरसाठी खर्च केला आहे, किती जणांनी विशेष नंबरसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत आणि यातून आरटीओ विभागाला किती रुपयांचा महसूल गोळा झाला यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Oct 13, 2020, 4:25 PM IST

कोल्हापूर - गाडीच्या खास नंबरच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापुरात लॉकडाऊन काळातही कोल्हापूरकरांनी आपल्या गाड्यांना आपल्या आवडीचा नंबर मिळविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. एकीकडे लॉकडाऊन काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याचे आपण सर्वांनी पाहिलंय मात्र दुसरीकडे कोल्हापुरात असा सुद्धा वर्ग आहेत ज्यांनी आपल्या गाडीला विशेष नंबर मिळावा यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस

कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गाडीचे नंबर सगळ्यांपेक्षा हटके आणि फॅन्सी असावेत, याची एक स्टाईलच कोल्हापुरात सुरू झाली आहे. 40 ते 50 हजारांच्या गाडींना सुद्धा 10 ते 20 हजार रुपये खर्च करून आपल्या आवडीचा नंबर घेतल्याची उदाहरणे आहेत. कोरोनाच्या या काळात सुद्धा अनेकांनी आपल्या गाड्यांच्या नंबरवर लाखो रुपये खर्च केले आहेत. एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झाले होते. मात्र, दुसरीकडे कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन विभागाला मात्र गाड्यांच्या विशेष नंबरवरून लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे. एप्रिल महिन्यापासून आज सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत विशेष नंबरसाठी तब्बल 1 कोटी 40 लाख इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकरांनी पैसे खर्च केले आहेत. यामध्ये 5 हजारांपासून अडीच लाखांपर्यंत नंबरवर पैसे खर्च केल्याची उदाहरणे आहेत. यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात काहीच नोंदणी झाली नव्हती. मात्र, जुलैपासून नोंदणीला सुरुवात झाली आणि सप्टेंबरमध्ये सर्वाधिक वाहन नोंदणी झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस यांनी म्हटले आहे.

★ कशा पद्धतीने नागरिकांनी आपल्या गाडीच्या खास नंबरवर खर्च केले आहेत यावर एक नजर :

5 हजारांपर्यंत -
एकूण 1 हजार 181 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 50 लाख 54 हजार इतका महसूल मिळाला आहे.

5 हजार 1 ते 7 हजार 500 रुपयांपर्यंत -
एकूण 122 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 9 लाख 50 हजार इतका महसूल मिळाला आहे.

7 हजार 501 ते 10 हजार रुपयांपर्यंत -
एकूण 27 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 2 लाख 70 हजार इतका महसूल मिळाला आहे.

10 हजार 1 ते 20 हजारांपर्यंत -
एकूण 43 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 6 लाख 60 हजार इतका महसूल मिळाला आहे.

20 हजार 1 ते 50 हजारांपर्यंत -
एकूण 240 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 62 लाख 85 हजार इतका महसूल मिळाला आहे.

50 हजार 1 ते 1 लाखांपर्यंत -
एकूण 4 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 2 लाख 80 हजार इतका महसूल मिळाला आहे.

1 लाखांपासून अडीच लाखांपर्यंत -
एकूण 3 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 4 लाख 50 हजार इतका महसूल मिळाला आहे.

एकूण विशेष नंबर गेलेल्या नागरिकांची संख्या 1 हजार 620 इतकी असून त्याद्वारे प्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल 1 कोटी 39 लाख 14 हजार इतका महसूल मिळाला आहे.

एकूण आकडेवारीचा विचार केल्यास सर्वाधिक महसूल 20 हजरांपासून 50 हजारांपर्यंत किंमत असलेल्या गाडीच्या नंबरवर लोकांनी खर्च केला आहे. त्यातून तब्बल जवळपास 63 लाख रुपयांचा महसूल गोळा झाला आहे तर 1 ते अडीच लाखांपर्यंतचे सुद्धा 3 जणांनी नंबर घेतले आहेत. त्याद्वारे साडे चार लाखांचा महसूल मिळाला आहे.

★ जुन्या गाड्यांचा नंबर पुन्हा नवीन गाड्यांना मिळावा हा सुद्धा ट्रेंड :

मिळालेल्या माहितीनुसार अनेकजण आपल्या घरातील एखाद्या जुन्या गाडीचा जो नंबर असतो तोच नंबर नवीन गाडी घेतल्यानंतर हवा असल्याचे अनेकजण सांगत असतात. घरातील सर्वच गाड्यांचे नंबर एकसारखे असावेत यावर सुद्धा अनेकांनी भर दिला आहे. मग तो नंबर काही खास नसला तरी चालेल पण जुन्या गाडीचाच नंबर हवा यासाठी पैसे मोजणारे सुद्धा अनेक आहेत.

हेही वाचा - आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी परत या; आयुक्तांच्या बदली विरोधात 'आप'ची निदर्शने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.