ETV Bharat / state

Kolhapur Exhibition : कोल्हापूरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये शाहू महाराजांच्या छायाचित्रे अन् दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन

author img

By

Published : Nov 23, 2022, 10:37 PM IST

शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे शाहू महाराजांच्या छायाचित्रे अन् दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शनाचे ( Exhibition of photographs and rare documents in Kolhapur ) आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 25 नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले राहिल.

Etv Bharat
Etv Bharat

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज ( Chhatrapati Shahu Maharaj ) हे लोककल्याणासाठी अविरतपणे झटले. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्ष्मी विलास पॅलेस येथील दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्र प्रदर्शन माहितीपूर्ण असून या प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

प्रदर्शन 25 नोव्हेंबरपर्यंत - शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन 25 नोव्हेंबर पर्यंत मोफत खुले राहिल. या प्रदर्शनामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दत्तक विधानासंबंधीची कागदपत्रे, त्यांच्या राज्यारोहण समारंभाची कागदपत्रे, राजर्षी शाहू महाराजांनी प्रशासन गतिमान होण्यासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय व पारित केलेले कायदे यांचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या सुधारणा, दीनदुबळ्यांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, कला, क्रीडा, कृषी, उद्योग क्षेत्रामधील शाहू महाराजांचे कार्य, दुष्काळ व प्लेग काळातील त्यांचे कार्य, या संदर्भातील अधिनियम, महत्वाचा पत्रव्यवहार, असे राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. त्याचबरोबर शाहू कालीन शस्त्रास्त्रांचेही प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या छायाचित्रे अन् दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सामाजिक बदलाचे कायदे आजही मार्गदर्शक - यावेळी माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रात भरीव कार्य केले. याबरोबरच त्यांनी सहकार, उद्योग, शिक्षण क्षेत्रासह सामाजाच्या विकासासाठी अनेकविध कायदे केले. जातीभेद निर्मूलन, घटस्फोटास व विधवा पुर्नविवाहास कायदेशीर मान्यता, स्त्रियांच्या संरक्षणाचा कायदा, अस्पृश्यतेला प्रतिबंध, सरकारी नोकरीत आरक्षण असे सामाजिक बदलासाठी त्यांनी तयार केलेले कायदे आजही मार्गदर्शक आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याची महती विषद करणारे हे छायाचित्र, दुर्मिळ कागदपत्रे व शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन विद्यार्थी, पालकांसह इतिहास अभ्यासकांसाठीही माहितीपूर्ण आहे. शाहू महाराजांचे विचार व कार्य कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी असे प्रदर्शन ग्रामीण भागात देखील आयोजित करणे आवश्यक आहे.

जगभरात कोल्हापूरची ओळख - माहिती अधिकारी वृषाली पाटील म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांच्या महान कार्यामुळेच जगभरात कोल्हापूर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. राजा असूनही जनकल्याणाच्या कार्याला वाहून घेत ते ऋषीतुल्य जीवन जगले. यासाठी कोल्हापूर संस्थानात त्यांनी विधवा पुर्नविवाहासह महिलांसाठी अनेक कायदे व सोयी सुविधा निर्माण केल्या. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करुन शैक्षणिक हित साधले. राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षामध्ये आयोजित केलेले हे प्रदर्शन सर्वांना उपयुक्त ठरेल. यावेळी अर्चना शिंदे यांच्यासह वस्तू संग्रहालय व पुरालेखागार कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.