ETV Bharat / state

Sonia Gandhi: ज्या कुटुंबाने देशाची सेवा केली त्या कुटुंबावर ईडी'ची कारवाई -ऋतुराज पाटील - ED inquiry against Sonia Gandhi

नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या मनी लाॅंन्डरींग बाबत चौकशी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. सोनिया गांधी आज मंगळवार (दि. 26 जुलै)रोजी चौकशीसाठी इडीसमोर हजर झाल्या आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत.

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन
कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन
author img

By

Published : Jul 26, 2022, 5:10 PM IST

कोल्हापूर - नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या मनी लाॅंन्डरींग बाबत चौकशी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ( Sonia Gandhi questioned by ED ) सोनिया गांधी आज मंगळवार (दि. 26 जुलै)रोजी चौकशीसाठी इडीसमोर हजर झाल्या आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. दरम्यान, भाजप आणि इडीच्या निषेधार्थ आज काँग्रेसने संपूर्ण राज्यभरात शांततापूर्ण सत्याग्रह करून निषेध आंदोलन केले आहे.

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन

ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी - कोल्हापुरात काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील, शिक्षक आमदार जयंत आजगावकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र येत कोल्हापुरातील पापाची तिकटी येथील गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन केले आहे. यावेळी काँग्रेसकडून मोदी सरकार आणि ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कोल्हापुरात निदर्शने - नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. यामुळे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते नेते आता आक्रमक झाले आहेत. राज्यभर त्यांनी सत्याग्रह आंदोलन छेडले आहे याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील पापाची तिकटी येथील गांधी पुतळ्यासमोर सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी मोदी हटाव, देश बचाव यासह अनेक घोषणांनी परिसरात दणाणून सोडण्यात आला.

कुटुंबावर ईडीची कारवाई - यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, देशात जेव्हा अन्याय सुरू होतो तेव्हा त्याचा आवाज आम्ही उठवत असतो. मात्र, हा आवाज दाखवण्याचा काम हे मोदी सरकार करत आहे. भाजप विरुद्ध काही बोलले की भाजप लगेच ईडीचा हत्यार उपसते असा आरोपही पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे. तसेच, ज्या गांधी कुटुंबीयांनी देशाची इतकी वर्ष सेवा केली, त्याच कुटुंबातील लोकांनवर ईडीची कारवाई होत आहे हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, पुढील काळात याविरोधात आम्ही ताकतीने उतरू असेही ऋतुराज पाटील म्हणाले आहे.

हेही वाचा - 'गेम' उलटला.. भाजपचे डझनभर आमदार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.