ETV Bharat / state

सरनाईक कारवाई : ईडीचा छापा हे त्या खात्याचे काम, यात भाजपचा हात नाही - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Nov 24, 2020, 4:47 PM IST

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरू आहे. त्यानंतर थेट समोर येऊन लढा, शिखंडीप्रमाणे कारवाया करू नका, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले होते. त्यावर ईडीची धाड हे त्या खात्याचे एक नित्यक्रमाती काम आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले.

Chandrakanti Patil Explanation
चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरू आहे. त्यानंतर थेट समोर येऊन लढा, शिखंडीप्रमाणे कारवाया करू नका, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले होते. यावर आपली प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी यामध्ये भाजपचा हात नसल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया देताना चंंद्रकांत पाटील

ईडीची धाड हे त्या खात्याचे एक नित्यक्रम आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. निवडणुका होईपर्यंत पक्ष असतो आणि निवडून आल्यानंतर ते सरकार असते. त्यामुळे, त्या सरकारमध्ये ढवळाढवळ करण्याची आमची संस्कृती नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

तसेच, देशात कोणतीही घटना घडली तर त्यामध्ये भाजपचाच हात आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे, आमचा हात जरा जास्तच भक्कम दिसत आहे. जर एखाद्यावेळी पाऊस कमी पडला किंवा पाऊस जास्त पडला, तर त्यामागेसुद्धा भाजपचा हात आहे असे म्हणतील, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.

काय आहे प्रकरण -

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ईडीचे छापे पडले आहेत. आज सकाळपासूनच ईडीची या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. यासोबतच शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपवर आरोप केले. शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून लढू नका, समोर येऊन लढाई करा, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना उत्तर दिले.

हेही वाचा - वीज बिले भरणार नाही; हिंमत असेल तर कनेक्शन तोडून दाखवा, राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.