ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : काळम्मावाडीतील दूधगंगा प्रकल्पाला कोणताही धोका नाही; जलसंपदा विभागाचे स्पष्टीकरण - काळम्मावाडी धरण

गुरुवारी दिवसभर तांत्रिक बाबी तपासल्या गेल्या. प्रथमदर्शनी धरणास कोणताही धोका नसल्याचे पाटबंधारे विभाग जलसंपदा विभाग यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केला आहे.

जलसंपदा विभागाचे स्पष्टीकरण
जलसंपदा विभागाचे स्पष्टीकरण
author img

By

Published : Oct 2, 2021, 2:45 AM IST

कोल्हापूर - ईटीव्ही भारतने काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला गळती अशा मथळ्याची बातमी प्रसारित केली होती. त्याची दखल घेत जलसंपदा विभागाने धरणक्षेत्राची पाहणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी येथील दूधगंगा प्रकल्पाला सद्यस्थितीत कोणताही धोका नाही. माध्यमात बातम्या प्रसारित झाल्यानंतर अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह तज्ञ लोकांनी धरणाची पाहणी केली आहे.

गुरुवारी दिवसभर तांत्रिक बाबी तपासल्या गेल्या. प्रथमदर्शनी धरणास कोणताही धोका नसल्याचे पाटबंधारे विभाग जलसंपदा विभाग यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केला आहे.

काळम्मावाडीतील दूधगंगा प्रकल्पाला कोणताही धोका ना

धरणाची पाहणी -

गुरुवारी अधीक्षक अभियंता महेश सूर्वे, दूधगंगा प्रकल्प कार्यकारी अभियंता अमोल नाईक, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दूधगंगा प्रकल्पावर भेट देऊन धरणाची पाहणी केली. धरणाची तपासणी केल्यानंतर इन्फेक्शन गॅलरी, फाउंडेशन गॅलरीची सखोल तपासणी केली. या तपासणीनंतर धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाला आहे. मात्र धरणाची नॉमिनल गळती प्रतिसेकंद 75 लिटर असावी असेही बांदिवडेकर यांनी स्पष्ट केले. धरणातील गळती प्रतिबंध करण्यासाठी आणि गळती कायमस्वरूपी थांबवण्यासाठी पीडब्ल्यूडीची तज्ञ समिती पुढील आठवड्यात धरणाक्षेत्राला भेट देईल. खबरदारी म्हणून धरणाची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं बांदिवडेकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र हे काम करत असताना पाण्याचा दाब कमी होणे आवश्यक आहे. पाण्याची पातळी कमी होणे आवश्यक आहे. असेही बांदिवडेकर यांनी स्पष्ट केले.

कोणताही धोका नाही -

सद्यस्थितीत धरणाला कोणताही धोका नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. तातडीने स्थलांतर करण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तज्ञ समितीचा अहवाल मंगळवार पर्यंत आल्यानंतर याबाबत अधिक स्पष्टता होईल. असे बांदिवडेकर यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांपासून बोरींग तपासणी झाली नाही याबाबत विचारले असता रोहित बांदिवडेकर यांनी, धरणावर बोरिंग पद्धतीची तपासणी साठी मशनरी उपलब्ध झाल्या आहेत. येत्या आठवड्याभरात या धरणाची तपासणीवरून पद्धतीने केली जाईल. या धरणात विक पॉईंट तयार झाले आहेत की नाही? याची तपासणी या माध्यमातून केली जाणार आहे. त्यानंतरच योग्य निदान समजले जाईल.असेही बांदिवडेकर यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.