ETV Bharat / state

Double murder : दुहेरी हत्याकांड ! मेंढपाळ बाप लेकाचा खून - गडहिंग्लजमध्ये दुहेरी हत्याकांड

मेंढपाळ बाप लेकाचा खून झाल्याची घटना ( Shepherd Father Son Murder) कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यातील एका शेतामध्ये ही घटना ( Double murder in Gadhinglaj ) घडली. मात्र शेतातून मारेकरी पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी तपासणी करत होते.

Double murder
Double murder
author img

By

Published : Nov 5, 2022, 10:33 AM IST

कोल्हापूर : नात्यामधील शाब्दिक वादावादी इतक्या टोकाला गेली की या वादवादीतून एका मेंढपाळ बाप लेकाचा खून झाल्याची घटना ( Shepherd Father Son Murder) घडलीये. कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यातील एका शेतामध्ये ही घटना ( Double murder in Gadhinglaj ) घडली. केचाप्पा मारुती हारके (वय 37 रा. जोडकुरळी, जि. बेळगाव) आणि मुलगा शंकर केचाप्पा हारके (वय 4) या दोघांचा खून झाला आहे. मात्र ज्या शेतात ते होते त्या शेतातून मारेकरी पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी तपासणी करत होते.

दुसऱ्या मेंढपाळांवर संशय : केंचाप्पा हारके हे ज्या शेतामध्ये वास्तव्यास होते त्याच्याच बाजूला संकरहट्टी परिवारातील अन्य मेंढपाळ सुद्धा होते. मात्र ते या ठिकाणाहून गायब असल्याने पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला आहे. त्यानुसार पोलीस त्यांचाही शोध घेत असून याबाबत अधिक तपास करत आहेत. दरम्यान, नात्यांमधील वैमनस्यातून झालेल्या या मारहाणीत निष्पाप चिमुकल्या शंकरचा बळी गेला आहे. त्याच्या गळ्यावर तसेच शरीरावर वर्मी घाव बसल्याने अति रक्तस्रावाने त्याचा मृत्यू ( Double murder in Kolhapur ) झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.