कोल्हापूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असणाऱ्या लढाईत डॉक्टर आणि नर्सेस महत्त्वाची जबाबदरी पार पाडत आहेत. देशावरील संकाटाशी सामना करताना सर्व रुग्णालये तसेच खासगी डॉक्टर्सदेखील पुढाकार घेत आहेत. काही ठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना विविध उपक्रमात सहभागी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले. तसेच काही ठिकाणी गाणी, नृत्य यामधून मनोरंजन करण्यात येत आहे.
असाच उपक्रम गडहिंग्लजमधील डॉक्टर आणि नर्स यांनी केलाय. सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन खास कव्वाली सादर केली आहे. या कव्वालीच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या कव्वालीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.