ETV Bharat / state

कोल्हापूर : बॅंकेसमोर गर्दी, आयुक्तांनी केली अधिकाऱ्याची कानउघडणी

शहरातील बॅंकांसमोर गर्दी होत असल्याने, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट रस्त्यावर उतरत, दसरा चौकातील एका बॅंक अधिकाऱ्याला धारेवर धरले. नियमाचे पालन होत नसेल तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

बॅंकेसमोर गर्दी, आयुक्तांनी केली अधिकाऱ्याची कानउघडणी

author img

By

Published : Apr 16, 2021, 5:20 PM IST

कोल्हापूर - शहरातील बॅंकांसमोर गर्दी होत असल्याने, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट रस्त्यावर उतरत, दसरा चौकातील एका बॅंक अधिकाऱ्याला धारेवर धरले. नियमाचे पालन होत नसेल तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

राज्यात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू झाली आहे. या संचारबंदीत केवळ अत्यावश्यक अस्थापनाच सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र नागरिक बँक, किराणा सामान खरेदी, मेडिकलचे कारण सांगून विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यासोबत शहरातील बँकाबाहेर देखील नागरिक मोठी गर्दी करत आहेत. काही बॅंका या ब्रेक द चेन नियमांचे पालन करताना दिसत नाही. बॅंकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे चित्र आहे. यावर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संताप व्यक्त केला आहे.

बॅंकेसमोर गर्दी, आयुक्तांनी केली अधिकाऱ्याची कानउघडणी

आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा

डॉ. कादंबरी बलकवडे या दसरा चौकातून व्हीनस कॉर्नरकडे जात होत्या, त्यावेळी दसराचौकातील कॅनरा बँकेसमोर त्यांना गर्दी दिसली. त्यावेळी आयुक्त बलकवडे यांनी ड्रायव्हरला तात्काळ गाडी थांबवायला सांगून, बँक अधिकाऱ्याला बाहेर बोलावले. बॅंकेसमोर गर्दी झाल्याने आयुक्तांनी बॅंक अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली, व पुन्हा गर्दी दिसल्यास कारवाई करू असा इशारा देखील दिला आहे.

हेही वाचा - राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार, म्हणाले- एकत्रित संकटावर मात करता येईल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.