कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात दानपेट्या ठेवल्या जातात. या दानपेट्या दीड ते दोन महिन्यातून एकदा उघडल्या जातात. पेट्यांमधील दानांची मोजणी सुरूआहे. 10 मेपासून मोजणी सुरू असून दररोज दोन दानपेट्या उघडल्या जात आहेत. पहिल्या दिवशी 10 मे रोजी 38 लाख 43 हजार 328 रुपये दानपेट्यात भक्तांनी दान केले होते. तर 11 मे रोजी 38 लाख 39 हजार 809 रुपये रक्कम दानपेट्यात मिळुन आली आहे. बुधवारी सायंकाळी दानपेटीतील सर्व रक्कम मोजल्यानंतर भाविकांनी अंबाबाईचारनी यांना 1 कोटी 72 लाख रुपयांचे दान अर्पण केले आहे.
सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली मोजदाद : अंबाबाईच्या चारनी भाविकांनी भरभरून दान दिले आहे. 10 मेपासून मोजणी दानाची मोजणी सुरू करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या विद्यमाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे दानाची मोजणी करण्यात आली. यासाठी 30 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
सुविधांची वानवा : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येतात. मात्र, महिलांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचा मनस्ताप भाविकांना सहन करावा लागत आहे. मंदिर परिसरात कडाक्याच्या उन्हामुळे मंदिर प्रशासनाने मंदिराभोवती मंडप उभारले. मात्र भाविकांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांची अजूनही वाणवा पाहायला मिळते.
सोन्या-चांदीचे दागिने अर्पण : करवीर निवासी अंबाबाई देवीला देशभरातील भाविक सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करतात. अशाच एका भक्ताने आई अंबाबाई देवीला सुमारे 47 तोळे सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटाची किंमत 24 लाख रुपये आहे. हा ज्वलंत मुकुट आठ मे रोजी शनिवारी देवीला अर्पण केला होता. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात लाखो भाविक येतात. अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविक तासन्तास रांगेत उभे असतात.
- हेही वाचा -
- Tulja Bhavani Temple News : अंगावर तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजापूर मंदिरात दर्शनास मनाई
- SC verdict on Jallikattu bullock cart: हुर्रे.. बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी, शर्यती घेण्याचा मार्ग मोकळा
- Law Minister of country: किरेन रिजीजू यांना कायदेमंत्री पदावरून हटविले; अर्जुन मेघवाल देशाचे नवे कायदा मंत्री