ETV Bharat / state

ईटीव्ही भारत स्पेशल : उसन्या नोकरीने घेतला उमद्या बापाचा जीव, 6 महिन्यांचा चिमुकला झाला पोरका - lockdown effect kolhapur news

लॉकडाऊनमध्ये घरातील बेताची परिस्थिती आणखी जास्त वाईट झाल्यावर नाईलाज म्हणून त्याने पंचगंगा स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम स्वीकारले. मात्र, अवघ्या 15 दिवसात त्याला स्मशानभूमीत कोरोनाची बाधा झाली आणि 2 दिवसांपूर्वी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा आघात बसला. तर, काही दिवसांपूर्वीच त्याचं या जगात आलेलं बाळ पोरकं झालं.

उसन्या नोकरीने घेतला उमद्या बापाचा जीव
उसन्या नोकरीने घेतला उमद्या बापाचा जीव
author img

By

Published : Sep 18, 2020, 5:35 PM IST

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे घाईला आलेल्या गोरगरीब जनतेला वाली कोणीच नाही. अशातच कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. असाच एक बाप आपल्या नव्या लेकराच्या पोटासाठी स्मशानभूमीत रोजंदारीवर कामाला गेला आणि 21 दिवसांतच त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही मन हेलवणारी कहाणी आहे कोल्हापुरातील दिपक थोरावत (वय 29) या तरुणाची. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा आघात बसला आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. 3 ते 4 महिने हा लॉकडाऊन राहिल्याने अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. सिद्धार्थनगरमध्ये राहणारा दीपक हा केटरिंगच्या कामाला जाऊन आपल्या झोपडीवजा घरात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र, लॉकडाउनमुळे कार्यक्रम बंद राहिल्याने रोजगार बंद झाला. अशा विदारक परिस्थीतीत त्याच्या घरात पाळणा हलला. मुलं पदरी पडलं मात्र, त्यासह जबाबदारीदेखील वाढली. हातात काम नाही, खायला अन्न नाही अशा परिस्थितीत नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याने दीपकच्या चिंतेत आणखी भर पडली. अखेर त्याने नाईलाजाने पंचगंगा स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम स्वीकारले. मात्र, अवघ्या पंधरा दिवसात त्याला स्मशानभूमीत कोरोनाची बाधा झाली आणि दोन दिवसांपूर्वी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा आघात बसला. काही दिवसांपूर्वीच या जगात आलेलं बाळ पोरकं झालं. आपला जन्मदाता बाप आता आपल्याला कधीच आंगा खांद्यावर खेळवू शकणार नाही. कोरोनाने त्याला हिरावून घेतले, याची साधी कल्पनाही आईच्या कुशीत निपचित पडलेल्या त्या चिमुकल्याला नसेल.

या कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने असे अनेक दीपक जीवावर उदार होऊन काम करत आहेत. 'स्मशानातील सोनं' शोधण्यासाठी असे अनेक दीपक कोरोनाकाळात लढताहेत. आपल्या जीवाचा त्याग करत अनेक दिपकांनी कोरोनाला तटवण्यासाठीचा निश्चय केला. मात्र, शासन याची दखल घेऊन त्यांना मदत करणार का हा मोठा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो. दीपकच्या जाण्यानंतर तरी शासनाने अशा कोरोना योद्धांची दखल घ्यावी अशी अपेक्षा त्याचे कुटुंबीय करताहेत. तर, दीपकच्या वारसांना महापालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी नगरसेवक किरण नकाते यांनी केली आहे. मात्र, शासनाची दारं या कुटुंबाच्या मदतीसाठी उघडतील का, आणि उघडतील तर केव्हा, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - आधी सर्वेक्षणाचे साहित्य द्या, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'चे काम न करण्याचा आशा वर्कर्सचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.