ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी? बंदी आदेश असून नागावमध्ये घेतला कार्यक्रम

author img

By

Published : Mar 15, 2020, 7:56 AM IST

Updated : Mar 15, 2020, 12:47 PM IST

जिल्हाधिकारी देसाई यांनी जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या आदेशाचे पालन नागावमध्ये झाले नसल्याचे दिसून आले आहे.

कोल्हापूर कोरोना
कोल्हापूर कोरोना

कोल्हापूर - कोरोना विषाणूमुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शनिवारपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा आदींवर 31 मार्चपर्यंत बंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, नागाव येथील एका संस्थेचा कार्यक्रम मात्र मोठ्या उत्साहात पार पडला.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी? बंदी आदेश असून नागावमध्ये घेतला कार्यक्रम

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आमदार विनय कोरे, माजी आमदार सुजित मिणचेकरसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा आदेश पायदळी तुडवला गेल्याची चर्चा परिसरात सुरू होती. जिल्हाधिकारी देसाई यांनी जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या आदेशाचे पालन झाले नसल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा - exclusive : पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या मांडण्यासाठी समरजितसिंह यांनी हाती घेतला 'ईटीव्ही भारत'चा बूम

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव ज्या पद्धतीने पसरत आहे. याबाबत प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. मात्र, प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी सुद्धा आता अशा आदेशांचे पालन करणे गरजेचे असून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे.

Last Updated : Mar 15, 2020, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.