ETV Bharat / state

कोल्हापुरात विभिन्न मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा; खर्डा-भाकरी खात अनोखे आंदोलन - विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचे आंदोलन

आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस व विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister satej patil house ) यांच्या कसबा बावड्यातील घरासमोर खर्डा भाकरी (Construction labourer agitation) आंदोलन करण्यात आले.

Construction labourer agitation
Construction labourer agitation
author img

By

Published : Dec 15, 2021, 3:26 PM IST

कोल्हापूर - आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस व विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister satej patil house ) यांच्या कसबा बावड्यातील घरासमोर खर्डा भाकरी आंदोलन (Construction labourer agitation) करण्यात आले. आता आम्ही खर्डा भाकरी आंदोलन करतोय शासनाने जर मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कामगारांच्या वतीने देण्यात आला.

बांधकाम कामगारांचा पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आश्वासन अद्याप स्वप्नच -

कामगारांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Labor Minister Hassan Mushrif) त्यांच्याकडे यापूर्वीसुद्धा अनेक मागण्यांबाबत साकडे घालण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी कामगारांना दिलासा देण्याबाबतचे आश्वासन दिलं होतं. त्याचबरोबर कामगारांचे विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडू असंही म्हटलं होते. शिवाय कामगारांना दिवाळी बोनस पाच हजार रुपये देऊ, असे आश्वासनही मंत्री मुश्रीफ (Labor Minister Hassan Mushrif) यांनी दिले होते. मात्र आज अखेर मुश्रीफ यांची ही केवळ घोषणा होती, प्रत्यक्षात कामगारांच्या खात्यावर १ रुपया देखील जमा झाला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. आज पालकमंत्र्यांच्या दारात आमचे गाऱ्हाणे मांडत असून त्यांनी तरी किमान आमच्याकडे लक्ष द्यावे आणि कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी केले आहे. येत्या काळात आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे आणि यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय गुदगे यांनी दिला आहे.

हे ही वाचा -Suspension of ST Workers : २३० निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाचा दणका

अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या प्रमुख मागण्या -

1.आर्थिक दृष्ट्या सक्षम नसेल्या नोंदणी कृत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस ५००० देण्यात यावा.
2. कर्तव्य दक्ष अधिकारी सहाय्यक आयुक्त संदेश अहिरे यांची बदलीचे आदेश रद्द करा.
3. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण त्वरित करा.
4. आत्महत्या केलेल्या एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांच्या परिवाराला दहा लाख रुपये देऊन परिवारातील एका सदस्याला एसटी महामंडळात नोकरी द्या.
5. समाज कल्याण विभाग कोल्हापूर येथील गेल्या तीन महिन्यापासून नादुरुस्त असलेल्या विपश्यना केंद्राचे त्वरित दुरुस्ती करावी.
6. बांधकाम कामगार व घरेलू मोलकरीण यांच्या मुलीचे लग्न झाल्यास 50 हजार रुपये मदत करावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.