कोल्हापूर दहीहंडीतील गोविंदाला सरकारी नोकरी देण्यामध्ये आरक्षण देण्याबाबत निर्णय सरकारने घेतला. याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा असे म्हटले Congress Leader Balasaheb Thorat On Govt Job Of Govindas आहे. सर्व निर्णय भावनिक होऊन घेणे योग्य नाही. असे निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. दुसरीकडे डॉल्बीमुळे शरीरावर वाईट परिणाम होत असतात Dolby Sound Has Bad Effects. डॉल्बीच्या आवाजावर देखीलमर्यादा आल्याच पाहिजेत असेही बाळासाहेब थोरात यांनी Balasaheb Thorat On Dolby म्हटले. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
अधिवेशनात पहिल्याच प्रश्नावर सरकारचा त्रिफळा दरम्यान, नुकतेच अधिवेशन पार पडले यामध्ये पहिल्याच प्रश्नावर उत्तर राखून ठेवण्यात आले. पहिल्याच प्रश्नावर सरकारचा त्रिफळा उडाला असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. अजूनही सर्वजण मंत्री झाल्याच्या आनंदात आहेत. यावेळी आपल्या सरकारमधील कामाबाबत बोलताना ते म्हणाले, कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी जे काम केले त्याची इतिहासात नोंद होईल. महाविकास आघाडी सरकारने Mahavikas Aghadi Govt खूप चांगल्या पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे आजारपणामुळे काही करू शकले नाहीत म्हणून असा उल्लेख करणे चुकीचे असल्याचे म्हणत फडणवीस आणि केलेल्या टिकेकर थोरात यांनी उत्तर दिले आहे.