ETV Bharat / state

पहाटेपासून रांगेत उभारूनही लस मिळत नसल्याने कोल्हापुरात नागरिकांचा गोंधळ - नोंदणी नसलेल्यांचे कोरोना लसीकरण नाही

मंगळवारपासून केवळ नोंदणी असणाऱ्या लोकांनाच लसीकरण करण्याची मोहीम सुरू झाल्याने बऱ्याच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ घातला. सकाळी पाच वाजल्यापासून रांगेत थांबून देखील लस मिळत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Apr 27, 2021, 5:17 PM IST

कोल्हापूर - पहाटे सकाळी चार वाजता उठून लस घेण्यासाठी रांगेत उभे राहायचे, १० वाजेपर्यंत उन्हात चटके सहन करायचे आणि लस संपली असल्याचे ऐकताच घरी जायचे. असा क्रम आयसोलेशन लस केंद्रावरील आहे. लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांनी आज या केंद्रावर संताप व्यक्त केला. ज्यांना नोंदणी करण्याचे माहिती आहे, ते लस घेऊन जातात. मात्र, आमच्यासारख्या अडाणी लोकांना काय? समजणार अशी भावना ज्येष्ठ नागरिक व महिलांची आहे.

कोल्हापूर कोरोना लसीकरण केंद्रावरील स्थिती

कोल्हापूर जिल्हा कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यात आघाडीवर आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 8 लाख 13 हजार 153 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने बऱ्याच केंद्रावर नागरिकांनी गोंधळ घातला होता. तसेच काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग देखील घडले होते. दरम्यान, आज सोमवारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे 70 हजार नवीन मात्रा उपलब्ध झाल्याने सोमवार पासून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला होता. सोमवारी एकाच दिवशी तब्बल 50 हजार नागरिकांना लस देण्यात आली. मंगळवारपासून केवळ नोंदणी असणाऱ्या लोकांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू झाल्याने बऱ्याच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ घातला. सकाळी पाच वाजल्यापासून रांगेत थांबून देखील लस मिळत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा - हे शिमला-मनाली नव्हे तर आपलं कोल्हापूर; अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस अन् बर्फवृष्टी

कोल्हापुरातील आयसोलेशन केंद्रावर लस संपल्याचे जाहीर करताच नागरिकांनी आणि ज्येष्ठ महिलांनी गोंधळ घातला. ज्यांना नोंदणीबाबत माहिती आहे, त्यांना लस दिली जाते. पण आमच्यासारख्या अडाणी लोकांनी नोंदणी कशी करायची? हे माहिती नसल्याने दरवेळी सकाळी पाचला येऊन लस न घेता माघारी फिरावे लागते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. सकाळी पाच वाजल्यापासून लसीसाठी नंबरात उभे राहतो. मात्र, कर्मचाऱ्यांकडून दहा वाजता लस संपल्याचे सांगितले जाते, असा दिनक्रम गेल्या चार दिवसांपासून सुरू असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ घातला पोलिसांनी हस्तक्षेप करून नागरिकांना आवाहन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.