कोल्हापूर : कोल्हापूर शहरात खूण, मारणारी, सावकारी प्रकरणातील गुंड अमोल भास्कर ( Amol Bhaskar ) यांचे शहरातील मुख्य चौकात भले मोठे होर्डिंग लागले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या होर्डिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे.
शहरात होर्डिंग बाजी - नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Executive Chairman of Planning Board Rajesh Kshirsagar ) यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून गुंड अमोल भास्कर याने स्वतःला सामाजिक कार्यकर्ते ही उपाधी लावत शहरात होर्डिंग बाजी केली आहे. शहरातील विविध मोक्याच्या ठिकाणी हे बॅनर लागले असून याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
भास्कर यांच्यावर गंभीर गुन्हे - दरम्यान, खुनातील संशयित आरोपी, सावकारी, अपहरण, लुटमार यासारख्या गंभीर गुन्ह्यात अमोल भास्कर यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. असे असताना देखील कोणाच्या पाठिंब्याने शहरात हे होर्डिंग लावले याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. शिवाय याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.