कोल्हापूर - कोल्हापुरात प्रशासनाला जे काही शक्य होते ते सर्व काही केले आहे. अजूनही सुविधांमध्ये वाढ करण्यामध्ये आम्ही तत्पर आहे. पण कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत गेली तर कितीही सुविधा केला तरीही त्या कमी पडतील त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करा असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आवाहन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आज कोल्हापूरच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शिवाय कोल्हापुरात जाहीर केलेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद देऊन कोरोनाची साखळी तोडण्यात मदत करा, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.
कोल्हापुरात पॉझिटिव्ही रेट 30 टक्क्यांवर; सर्वांनी काळजी घेण्याची गरज -
यावेळी जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. जानेवारी महिन्यात पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांवर होता तोच पॉझिटिव्ही रेट सध्या 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे हा संसर्ग खूप वेगाने पसरतोय हे सिद्ध होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात उद्यापासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. प्रशासन म्हणून जनतेची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतली आहे. मात्र नागरिकांनी सुद्धा आता लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील मृत्यूदर सुद्धा वाढला आहे. तो कमी करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्त करत आहोत. जिल्हयात आजपर्यंत झालेल्या मृत्यूमध्ये 15 टक्के रुग्ण जिल्ह्याबाहेरचे आहेत. आजपर्यंत एकूण 2 हजार 900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यातील 163 रुग्ण जिल्ह्याबाहेरचे आहेत.
नागरिकांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद द्यावा; पालकमंत्री सतेज पाटलांचे जनतेला आवाहन - कोल्हापूर लॉकडाऊन
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. जानेवारी महिन्यात पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांवर होता तोच पॉझिटिव्ही रेट सध्या 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे हा संसर्ग खूप वेगाने पसरतोय हे सिद्ध होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात उद्यापासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.