कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट आज टीव्हीवर प्रदर्शित ( Har Har Mahadev release on TV ) होत आहे. तर याला स्वराज्य संघटने कडून तीव्र विरोध होत असून या विरोधात संबंधित वाहिनीला इशारा देखील देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार ( Chhatrapati Sambhaji Raje press conference ) परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
इतिहासाची मोडतोड करण्याला विरोध : छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, माझा विरोध निर्मात्याला किंवा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला नाही. माझा फक्त ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करण्याला विरोध आहे. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला आहे. हाच चुकीचा इतिहास आपण नव्या पिढीसमोर ठेवणार आहोत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. ऐतिहासिक चित्रपटांसाठी इतिहासकारांची समिती नेमावी, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे. तसेच यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
चुकीच्या दृश्यांना विरोध : ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबतील त्यांनी चुकीच्या पद्धतीने दाखवलेल्या इतिहासावर संताप व्यक्त करत चुकीच्या स्क्रीनचा पाढा वाचून दाखवला. यावेळी ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवणे चुकीचे आहे. आपला जाज्वल्य इतिहास आपण असा चुकीच्या पध्दतीने नव्या पिढीसमोर ठेवणार आहोत का? चित्रपटाचे पहिला स्क्रीनिंग महाराष्ट्रात व्हायला हवे. या चित्रपटात चुकीच्या द्श्याला आपला विरोध राहील. इतिहास चुकीचा दाखवण्यापेक्षा चित्रपट काढूच नका, अशी भूमिका त्यांनी मांडली.