कोल्हापूर - 'कंगना रणौत ज्या पद्धतीने व्यक्त होत आहे, त्याच्याशी सहमत नाही. शिवाय कालच विधेयकाला विरोध करणाऱ्यांबद्दल कंगनाने जी भाषा वापरली त्याचे सुद्धा आम्ही समर्थन करत नाही,' असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कंगणाच्या अशा पद्धतीने लोकांच्या भावना दुखावणाऱ्या आणि विचार न करता केलेल्या कोणत्याही ट्विटशी आम्ही सहमत नाही. शिवाय कंगनाशी माझा व्यक्तिगत संवाद नाही. मात्र, व्यक्त होताना त्यांनी शब्द जपून वापरावेत, असा सल्ला सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया ते म्हणाले, 'लोकांच्या भावना दुखवणारे शब्द त्यांनी वापरू नयेत. त्या जे काही म्हणतात किंवा वापरतात त्यानंतर त्याचा किती मोठा दुष्परिणाम होणार आहे, हे त्यांना कळते की नाही, हे मला माहिती नाही. पण हा संपूर्ण त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे. त्यामुळे आम्ही त्यामध्ये लक्ष देणार नसून त्यांच्या अशा ट्विटशी कदापिही सहमत नाही,' असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. एकीकडे, कंगना रणौत भाजपच्या समर्थनात तसेच भाजपच्या बाजूने ट्विट करताना आणि व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. मात्र, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनीच आता कंगनाला, 'शब्द वापरताना जपून वापरावेत,' असा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्याला
कंगनाकिती किंमत देते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा - हे तेच दहशतवादी आहेत; शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाजपच्या "झांसे की" राणीची मुक्ताफळे