ETV Bharat / state

ST Employee Dies In Hatkanangle Taluka : एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याचा तणाव; वाहकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू - शरणाप्पा गिरमलप्पा मुंजाळे यांचे निधन

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात संपाच्या तोडग्याबाबत बैठक झाली. (ST Employee Dies In Hatkanangle Taluka) परंतु, यामध्ये कोणताच ठोस निर्णय झाला नाही याचे टेन्शन घेतल्याने या कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका आला (ST Employee Dies In Kolhapur District) असल्याचे त्यांच्या नातेवाईकांसह येथील कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एसटी वाहक शरणाप्पा गिरमलप्पा मुंजाळे (मृत)

author img

By

Published : Jan 11, 2022, 12:40 PM IST

कोल्हापूर - एसटी महामंडळाचे शासनात (Meeting on ST Workers Strike) विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यात प्रत्येक अगारात बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरु आहे. यावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. (ST Employee Dies In Hatkanangle Taluka) त्यामुळे गेली दोन महिन्यापासून हे आंदोलन सुरूच आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान, सुमारे 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. आज हातकणंगले तालुक्यातील शहापूर येथील एसटी कर्मच्याऱ्याचा हृदयविकाराच्या (ST Employee Dies In Kolhapur District) धक्क्याने मृत्यू झाला आहे. (ST Workers Strike) शरणाप्पा गिरमलप्पा मुंजाळे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

परब यांच्यासह आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar appeal to ST employees ) आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात संपाच्या तोडग्याबाबत बैठक झाली. परंतु, यामध्ये कोणताच ठोस निर्णय झाला नाही याचे टेन्शन घेतल्याने या कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका आला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांसह येथील कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (meeting on st workers strike mumbai) ही घटना घडल्यानंत येथील संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांसह नातेवाईकांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यार नाहीत अशी भुमिकाही त्यांनी घेतली आहे.

कोणताही मार्ग न निघाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटका

गेल्या 2 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहे. हे संप मोडीत काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडून अनेक प्रयत्न झाले. मात्र, एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे आज एसटी. कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत सोमवारी मुंबई येथे खासदार शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत कर्मचारी संघटना प्रतिनिधींनी बैठक बोलविण्यात आली होती. त्यामध्ये तोडगा निघेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु, या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीनंतर शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब तसेच कृती समितीने संयुक्त रित्या पत्रकार परिषद घेतले. ही पत्रकार परिषद आंदोलक एसटी वाहक शरणाप्पा गुंजाळे उपोषणस्थळी मोबाईलवर पाहत होते. बातमी पाहताना कोणताही निर्णय न झाल्याचे ऐकून त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जाग्यावरच कोसळले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ हालचाली करत त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथे पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अनिल परब यांच्यासह संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुंजाळे हे मूळचे अक्कलकोटचे रहिवाशी होते. साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांची सिंधुदुर्ग येथून इचलकरंजीत बदली झाली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यांना ५ जानेवारीला कारणे दाखवा नोटिसही बजावण्यात आली होती या सर्वाचा दडपण आणि मुंबई येथील बैठकीत एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत निर्णय न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असा संताप व्यक्त करत सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. तसेच, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गर्दी न करत या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. रात्री, उशीरा या प्रकरणी आकस्मिक निधन म्हणून नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रुग्णालयाबाहेर एसटी महिला कर्मचाऱ्यांसह नातेवाईकांचा आक्रोश ऐकून अनेकांचे काळीज पिळवटून टाकत होते.

हेही वाचा - Corona Test Regulations of ICMR : कुणी करावी कोरोना चाचणी? वाचा (ICMR)ची नवी नियमावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.