ETV Bharat / state

kolhapur Burning Car : आजऱ्यात बर्निंग कारचा थरार; शेजारचे झाडंही जळून खाक, चौघे बजावले - आजरा आंबोली रोड कार जळाली

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा-आंबोली ( Ajra Amboli Road Burning Car ) मार्गावर वेळवट्टी नजीक आज पहाटे बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. गोव्याहून जालन्याच्या दिशेने जाताना वेळवट्टी ( Velbhatti Car Burning ) येथे पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

kolhapur Burning Car
kolhapur Burning Car
author img

By

Published : Feb 12, 2022, 2:43 AM IST

कोल्हापूर - आजरा-आंबोली ( Ajra Amboli Road Burning Car ) मार्गावर वेळवट्टी नजीक आज पहाटे बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. गोव्याहून जालन्याच्या दिशेने जाताना वेळवट्टी ( Velbhatti Car Burning ) येथे पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून केवळ सांगाडा राहिला आहे.

आजरा आंबोली रोड कारला आग

शेजारचे झाडंही जळून खाक -

मिळालेल्या माहितीनुसार, रामप्रसाद नरहरी कावळे यांच्या गाडीने पहाटे आजरा येथे मुख्य मार्गावर अचानक पेट घेतला. यामध्ये गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून आता केवळ सांगाडा राहिला आहे. अचानक लागलेल्या या आगीमध्ये रस्त्याशेजारी एक झाडही जळून खाक झाले. या गाडीतून चौघेजण जालण्याच्या दिशेने आजरा मार्गे चालले होते. एक्सयुव्ही 500 या मॉडेलची ही गाडी असून अचानक लागलेल्या आगीमुळे गाडीतील चौघेही तत्काळ बाहेर पडल्याने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा - Don Chhota Rajan Hearing : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हॉटेल व्यावसायिक हत्या प्रकरणातून दोषमुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.