ETV Bharat / state

MLA Mushrif Met Shinde Family: उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: शिंदे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून मुश्रीफांच्या डोळ्यातही पाणी - उद्योजक संतोष शिंदे

गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तरुण उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी, मुलासह शनिवारी आत्महत्या केली आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी संतोषच्या आई सुमित्रा, बहीण प्रतिभा यांनी केलेल्या आक्रोशाने आमदार मुश्रीफही नि:शब्द झाले. शिंदे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून त्यांचेही डोळे पाणावले.

MLA Mushrif Met Shinde Family
उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण
author img

By

Published : Jun 27, 2023, 4:26 PM IST

शिंदे कुटुंबीयांची विचारपूस करताना पालकमंत्री केसरकर आणि आमदार मुश्रीफ

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील गांधीनगर मधील संतोष शिंदे यांच्या घरी सांत्वनासाठी गेले. यावेळी संतोष यांची आई, बहीण आणि नातेवाईकांनी मुश्रीफ यांच्या समोर हंबरडा फोडला. शिंदे कुटुंबीयांसह नातलगांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. आई रडतच सांगत होत्या, "माझं पोरगं सरळ आणि प्रामाणिक होतं. कष्टातून उभं राहिलेलं आमचं कुटुंब आहे. माझ्या चिमुकल्या नातवानं काय गुन्हा केला होता आणि हे ऐकून मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले.

शिक्षा झालीच पाहिजे: आमदार मुश्रीफ हे संतोष यांच्या घरी आल्याचे समजताच शहरातील विविध संघटनांच्या प्रमुखांनीही घराकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक गजानन सरगरही पोहोचले. शिंदे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी रचलेल्या कटामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना जास्तीत-जास्त शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी उपस्थितांनी मुश्रीफांकडे केली. या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक सरगर यांना दिल्या. जोपर्यंत या गुन्ह्यातील आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत शहर अस्वस्थच राहील, असेही सांगितले.

पालकमंत्र्यांचीही भेट: याप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पालकमंत्री दीपक केसरकरांशी भेट घडविण्याची मागणी उपस्थितांनी केली. त्यानुसार मुश्रीफ यांनी पालकमंत्री केसरकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला आणि काल सोमवारी कोल्हापुरातील शासकीय विश्रागृहावर त्यांची भेटही घडवून आणली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, संजय रोटे, दीपक कुराडे, प्रकाश पताडे, गुंड्या पाटील, महेश सलवादे, राजू जमादार, राहुल शिरकोळे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी दोन्ही संशयिताना कडक शिक्षा व्हावी आणि ही विशेष केस म्हणून त्वरित न्यायलायीन कारवाई कारवाई असे आवाहन केले. या गुन्ह्यातील संशयित आरोपी API राहुल राऊत यालाही त्वरित निलंबित करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी करण्यात आली. दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही त्वरित ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

दोघांना पोलीस कोठडी: संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्योजक संतोष शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये चार जणांची नावे लिहिली होती. यामध्ये माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि पोलीस अधिकारी राहुल राऊत यांचा समावेश होता. या दोघांनी संतोष शिंदे यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. या दोघांनाही कोल्हापूर पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले; मात्र याच प्रकरणातील आणखी दोघांचा शोध कोल्हापूर पोलीस करत आहेत. पुण्यामधील विशाल बाणेकर आणि संतोष पाटे यांची नावे देखील सुसाईड नोटमध्ये लिहिली होती. पुण्यातील दोघांची नावे आर्थिक व्यवहारातून लिहिली आहेत. त्यामुळे पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.