कोल्हापुर - गांधीनगर वसाहत रुग्णालयात कोविड लसीकरण सुरु असताना सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला. पोलीस येताच रुग्णालय प्रशासनाला नियम आठवले. लोक पहाटे पासून गर्दी करत असून याठिकाणी रोजच सोशल डिस्टंटसचा फज्जा उडत आहे. आज नियमांचे आठवण करून देण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक निर्बंध घालत लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या वसाहत रुग्णालयात दररोज दिडशे ते दोनशे लोकांना लसीकरण करण्यात येत आहे. लस घेण्यासाठी लोक पहाटे पासून रांगेत उभे असतात. रोज दोनशेहून अधिक लोक पाळीत उभे राहत आहेत. दरम्यान सोशल डिस्टंटसचा फज्जा उडत आहे. अनेकवेळा नंबरवरुन वादावादीचे प्रसंग घडत आहेत.आज तर शिस्त लावण्यासाठी गांधीनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पण लोक पोलिसांनाही जुमानत नसल्याच चित्र पहायला मिळाले. तर रुग्णालय प्रशासनदेखील या नियमाकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.