ETV Bharat / state

Both Vaccination Doses Mandatory : कोल्हापुरात प्रवेशासाठी लसीचे दोन्ही डोस बंधनकारक ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - both vaccination doses mandatory in kolhapur

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कोल्हापुरात प्रवेश घेण्यासाठी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय ( Both Vaccination Doses Mandatory ) घेतला. दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असल्यास सुद्धा प्रवेश मिळणार आहे. अशी कोल्हापुरात कोरोनाची नवीन नियमावली जाहिर करण्यात आली आहे.

Both Vaccination Doses Mandatory
कोल्हापुरात प्रवेशासाठी लसीचे दोन्ही डोस बंधनकारक
author img

By

Published : Nov 30, 2021, 1:15 PM IST

Updated : Nov 30, 2021, 2:03 PM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आता प्रशासन चांगलंचे सावध झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कोल्हापुरात प्रवेश घेण्यासाठी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय ( both vaccination doses mandatory in kolhapur ) घेतला. दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असल्यास सुद्धा प्रवेश मिळणार आहे. नुकतीच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत नियमावली जाहीर केली असून आजपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे.

कारवाई करताना अधिकारी

जिल्ह्यात पुन्हा कडक तपासणी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई -

दरम्यान, संभाव्य कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आता देशात पुन्हा एकदा कडक नियमावली बनविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाले असून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेत नव्या ओमॅक्रोन कोरोना व्हेरिएंट ( New Omicron Corona Variant in South Africa ) आढळलेल्यामुळे संपूर्ण जगात पुन्हा एकदा सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आता तपासणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा येणार असाल तर आता कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असायला हवे किंव्हा दोन्ही डोस पूर्ण असणे बंधनकारक आहे. एव्हढेच नाही तर आजपासून अनेक कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. यामध्ये पूर्वीप्रमाणे प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर चा वापर, सोशल डिस्टन्स आदींचे पालन करणे गरजेचे आहे. जे कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

शहरात कारवाईला सुरुवात -

नियमावलीनुसार कडक अंमलबजावणीला सुरुवात झाली असून आज सकाळपासूनच शहरातील विविध ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जात आहे. शिवाय सोशल डिस्टन्सचा वापर करण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 6 हजार 761वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 935 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांची संख्या 5 हजार 796 झाली आहे तर सद्यस्थितीत केवळ 30 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - मोठा दिलासा : कोल्हापुरात आज एकही कोरोनाग्रस्त नाही, कोरोनाने मृत्यूही नाही

Last Updated : Nov 30, 2021, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.