ETV Bharat / state

RangPanchami Jayaprabha Studio : जयप्रभा स्टुडिओ कलाकारांनी साजरी केली काळी रंगपंचमी - काळी रंगपंचमी कोल्हापूर जयप्रभा स्टुडिओ

कोल्हापूर येथील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी ( Save Jaiprabha Studio ) अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने गेल्या 38 दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या दारात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, या आंदोलनाची दखल अद्याप शासनाने घेतली नसल्याने सरकारचा निषेध करत कलाकार आंदोलकांनी काळी रंगपंचमी साजरी केली.

RangPanchami Jayaprabha Studio
RangPanchami Jayaprabha Studio
author img

By

Published : Mar 22, 2022, 2:45 PM IST

कोल्हापूर - येथील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी ( Save Jaiprabha Studio ) अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने गेल्या 38 दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या दारात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, या आंदोलनाची दखल अद्याप शासनाने घेतली नसल्याने सरकारचा निषेध करत कलाकार आंदोलकांनी काळी रंगपंचमी साजरी केली.

प्रतिक्रिया

आंदोलकांनी एकमेकांना काळा रंग लावून ही रंगपंचमी साजरी करत सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. कोल्हापूरची श्वेता आणि भालजी पेंढारकर यांची आठवण असलेली जयप्रभा स्टुडिओ ची जागा तब्बल सहा कोटी 50 लाख रुपयांना विक्री झाल्याचे समोर आले आहे. सदर ची जागा श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी फर्मने खरेदी केली असून यामध्ये जिल्ह्यातील शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांच्या दोन पुत्रांचा देखील सहभाग आहे.यामुळे हा स्टुडिओ कलाकारांसाठी पुन्हा सुरू करावा यासाठी गेल्या 38 दिवसापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने जयप्रभा स्टुडिओ च्या दरात साखळी उपोषण सुरू आहे.

काळी होळी खेळायची वेळ येईल -

दरम्यान गेल्या 38 दिवसापासून चालू असलेल्या उपोषणाची दाखल सरकारने न घेतल्याने कलाकारांनकडून काळी रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे. एकमेकांना काळा रंग लावून रंगपंचमी साजरी केली आहे. एकाबाजूला राज्यात निरनिराळया रंगाची उधळण करत रंग खेळले जात असताना दुसऱ्या बाजूला कलाकारांवर काळी होळी साजरी करण्याची दुर्देवी वेळ आल्याचे कलाकारांनी म्हंटले आहे. तसेच आज आम्ही काळी होळी खेळत आहोत भविष्यात समोरच्यांना काळी होळी खेळायची वेळ येईल असा इशारा कलाकारांनी दिला आहे.

हेही वाचा - MC Todfod Passes Away : रॅपर एमसी तोडफोड याचे २४ व्या वर्षी निधन, गल्ली बॉय टीमसह संगीतक्षेत्रात शोककळा

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची तब्बल 6 कोटी 50 लाखांना विक्री झाली आहे. कोल्हापुरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड होते. जी जागा हेरिटेज वास्तू मध्ये होती. त्याचीच विक्री झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

या आहेत मागण्या -

  1. जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ खुला झाला पाहिजे
  2. जयप्रभा स्टुडिओ मधील इमारतीसह खुली जागा आरक्षित रहावी व चित्रीकरण या व्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये
  3. कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यावसायीकीकरण/वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये
  4. जयप्रभा स्टुडिओ याचे जतन होण्याकरिता शासनाने व कोल्हापूर महानगर पालिकेने लक्ष घालावे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.