ETV Bharat / state

Chandrakant Patil on Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून नेहमी माझी चेष्टा, ही चेष्टा त्यांच्या अंगलट येणार - चंद्रकांत पाटील - chandrakant patil latest news

शिवसेना नेते तथा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Shivsena Leader Yashwant Jadhav ) यांच्या घरी आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत एक महत्वपूर्ण डायरी हाती लागली आहे. या डायरीमध्ये 'मातोश्री' नावाने दोन कोटी साठ लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता विरोधक ही आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp State President Chandrakant Patil ) यांनी अजून खूप काही होणार असल्याचे म्हटले आहे.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Mar 27, 2022, 2:51 PM IST

Updated : Mar 27, 2022, 3:57 PM IST

कोल्हापूर - शिवसेना नेते तथा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Shivsena Leader Yashwant Jadhav ) यांच्या घरी आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत एक महत्वपूर्ण डायरी हाती लागली आहे. या डायरीमध्ये 'मातोश्री' नावाने दोन कोटी साठ लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता विरोधक ही आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp State President Chandrakant Patil ) यांनी अजून खूप काही होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या चौकशीतुन आता कुणी सुटणार नाही, असेही ते म्हणाले. नेहमी संजय राऊत हे माझी चेष्टा करत असतात. मात्र, हेच त्यांच्या अंगावर येणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यांनी सामना वाचणेही बंद केले असल्याचे ते म्हणाले आहेत. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुढे अजून खूप काही होणार आहे - शिवसेना नेते तथा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी झालेल्या छापेमारीत एक महत्त्वपूर्ण डायरी आयकर विभागाच्या हाती लागल्याने आणि त्यामध्ये मातोश्रीला दोन कोटी 60 लाख रुपये दिल्याचे उल्लेख असल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आता यावर विरोधक आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाल, महाविकास आघाडीचे महान नेते काहीही आरोप करो. मात्र, या सर्व तपास यंत्रणा स्वायत्त आहेत. त्यामुळे ते कधी काय करणार आहेत कोणाला सांगत नाहीत. मात्र, अशी कोणती डायरी सापडली आहे का? किंवा त्यात काही म्हणत आहे का? हे मला माहीत नाही. मात्र, पुढे अजून खूप काही होणार असल्याचे मला दिसत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा - Suspicious Transactions : यशवंत जाधवांनी 'मातोश्री'ला दिले 2 कोटी 60 लाख? आयकरने जप्त केलेल्या डायरीतउल्लेख

तसेच या डायरी संदर्भात ईडी मार्फत चौकशी करण्याची भाजप आमदार अतुल भातखळकर यांची मागणी ही योग्य योग्य आहे. या चौकशीतून आता कोणीही सुटणार नाही. संजय राऊत यांच्या कडून नेहमी माझी चेष्टा केली जाते पण ही चेष्टा त्यांच्या अंगावर येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांनी आज सामनाच्या रोखठोक मधून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे पण मी सामना वाचणे बंद केले असल्यामुळे संजय राऊत यांच्यावर बोलणेही बंद केले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Last Updated : Mar 27, 2022, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.