मुंबई - आज राज्यामध्ये 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर 3836 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आज 28 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 % एवढा आहे.
LIVE : - सोमैय्या यांच्या रडारवर ठाकरे आणि पवार, मुश्रीफ म्हणाले भाजपाचे षडयंत्र
22:34 September 20
आज राज्यात 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.18 टक्क्यांवर
18:35 September 20
राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, संपूर्ण मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी
मुंबई - राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. कोकणात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज आणि उद्यासाठी कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
15:08 September 20
किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार - हसन मुश्रीफ
मुंबई - किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच आरोपांच्या सत्रांमागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे, या प्रकरणी चंद्रकांत पाटील मास्टर माईंड असल्याचेही ते म्हणाले.
11:42 September 20
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नाही तर काँग्रेसच्या आमदारांचीही नावे पुढे येतील- चंद्रकांत पाटील
शरद पवार अशा कोणत्या घोटाळे बाजांना पाठिशी घालणार नाहीत, त्यामुळे मुश्रीफांची तब्येत बिघडली
मंत्र्यांचे जावई रडावर नाहीत, तर घोटाळे करणारे आणि अन्याय करणारे आहेत
महाविकास आघाडीत समन्वय नाही, एकमेकांची मजा पाहण्यात दंग आहेत- चंद्रकांत पाटील
मुश्रीफांना ऑफर दिली नाही, त्यांनी आता हा ड्रामा बंद करावा, कायद्याची लढाई कायद्याने लढा- चंद्रकांत पाटील
ईडीची नोटीस निघेल- चंद्रकांत पाटील
11:13 September 20
कायदा सुव्यस्थेच्या परिस्थितीमुळे ही कारवाई - मुश्रीफ
11:08 September 20
पवार साहेबांचे नाव घेण्याची सोमैयाची लायकी नाही - मुश्रीफ
मंत्री म्हणून कार्य करत असताना माझ्यावर कोणताही आरोप झाला नाही
सोमैयांनी चिक्की घोटाळा, गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करावी- मुश्रीफ
चंद्रकांत पाटलांचा घोटाळा बाहेर काढणार - मुश्रीफ
आमचा फेविकॉलचा जोड, 5 -10 वर्ष सरकार चालणार- मुश्रीफ
जरंडेश्वर कारखाना म्हणजे आदर्श कारखाना आहे - मुश्रीफ
11:03 September 20
ब्रिक्स इंडिया कंपनीशी आमचा काहीही संबंध नाही - मुश्रीफ
ब्रिक्स इंडिया कंपनीशी माझा आणि माझ्या जावयाचा सुतराम शक्यता नाही.
ब्रिक्स इंडिया कंपनी 75 कोटी रुपयांनी तोट्यात
सोमैयांनी नितीन गडकरींचा सल्ला घ्यावा
अप्पासाहेब नलावडे कारखान्याच्या घोट्याळ्याप्रकरणी 50 कोटीचा मानाहानीचा दावा ठोकणार - मुश्रीफ
महाविकास आघााडीला बदनाम करण्याचा डाव यशस्वी होणार नाही-
10:58 September 20
किरीट सोमैयांचे आरोप हे भाजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे मास्टरमाईंड- मुश्रीफ
- चंद्रकांत पाटील यांनी भाजपामध्ये येण्याची ऑफऱ दिली होती, आयकर विभागाची धाडही टाकली
- कोल्हापुरातील भाजप संपुष्टात आल्यामुळेच त्यांनी चंद्रकांत पाटलांचे कारस्थान
- हसन मुश्रीफ यांना संपवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा डाव - मुश्रीफ
- चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थ दाखवून लढावे, त्यांना माझ्या कुटुंबाची बदनामी करून काय मिळणार नाही- मुश्रीफ
- किरीट सोमैया यांचे बिनबुडाचे आहेत, आजचाही आरोप तसाच आहे
- सोमैयांची सीएची पदवी खरी आहे का? याचा तपास करण्याची गरज - मुश्रीफ
- किरीट सोमैयांनी आरोप केलेल्या प्रकरणात माफी मागावी- मुश्रीफ
10:00 September 20
उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना मी घाबरत नाही - सोमैया
- उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रात दडपशाही सुरु आहे.
- माझा मुलगा नील सोमैया याला पोलीस ठाण्यात बोलावून अपप्रचार करण्यात आला.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना मी घाबरत नाही.
09:38 September 20
पवारांच्या मार्गदर्शनाशिवाय माझी अडवणूक झाली नसती - सोमैया
09:35 September 20
- सोमैया यांच्या रडारवर आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार
- गुरुवारी पारनेर साखर कारखान्यालाही भेट देणार आहे.
- पुढच्या सोमवारी (२७ सप्टेंबर) रश्मी ठाकरे यांनी खरेदी केलेल्या कार्लाई येथील जमिनीची पाहाणी करणार आहे.
- अजित पवार यांनी खरेदी केलेल्या जरंडेश्वर कारखान्याला भेट देणार आहे.
- उद्धव ठाकरे सरकार मला कुठे-कुठे अडवणार, असा सवाल सोमैय्या यांनी केला आहे.
- उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रात दडपशाही सुरू आहे.
09:32 September 20
हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा पुढच्या आठवड्यात उघड करणार
गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना लिलावाची प्रक्रिया दाखवण्याचा प्रयत्ना केला.
- २०२० मध्ये ब्रिक्स इंडिया कंपनीला कारखाना देण्यात आला. ब्रिक्स इंडिया ही बेनामी कंपनी असल्याचा सोमय्यांचा आरोप.
- ब्रिक्स इंडियामध्ये ९८ टक्के शेअर कॅपिटल कोलकात्यातून आले. यात दोन टक्केच शेअर हे मुश्रीफ यांच्या जावयाचे आहेत.

- मला सहा तास घरात कोंडून ठेवण्यात आले. गणेश विसर्जनासाठी बाहेर पडू दिले नाही.
09:31 September 20
मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडी आणि आयकर विभागाकडे सुपूर्द करणार- सोमैया
मुश्रीफ यांच्या कंपनीत १२७ कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून वळवण्यात आले याचे उत्तर मुश्रीफ यांनी का दिले नाही - सोमैय्या
- सर सेनापती घोरपडे सहकारी साखर कारखान्यात बोगस कंपन्यांद्वारे पैसा आणण्यात आला
- हसन मुश्रीफ यांचे घोटाळे बाहेर काढण्याची मला फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सूचना.
- हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा कारखान्याकडे वळवल्याचा सोमय्या यांचा आरोप.
- हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा पुढच्या आठवड्यात उघड करणार.
-
09:30 September 20
- मला मुंबईबाहेर निघण्यावर प्रतिबंध केल्याचे आदेश उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या पोलिसांनी दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मी पोहोचणार नाही असे प्रयत्न केले गेले.
- उद्धव ठाकरे सरकारने मला आंबेमातेच्या दर्शनासाठी जाऊ दिले नाही. किरीट सोमय्यांचा महाराष्ट्र सरकारवर आरोप.
- हसन मुश्रीफांमुळे मला आंबेमातेचे दर्शन घेता आले नाही - सोमैय्या
- बनावट आदेश दाखवणारे पोलिस आणि महाराष्ट्र सरकारविरोधात कोर्टात दाद मागणार - सोमैय्या
- किरीट सोमय्या यांच्यावर गनिमी काव्याने हल्ला होऊ शकतो. त्यांच्या जीवाला धोका आहे, ही माहिती महाराष्ट्र सरकारने संबंधित सुरक्षा यंत्रणांना का दिली नाही, - सोमैय्यांचा सरकारला सवाल
-
09:05 September 20
पोलिसांच्या कारवाई विरोधात न्यायालया जाऊन दाद मागणार - सोमैया
- कोल्हापूर कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायची आहे, मात्र तक्रारादाराला रोखण्याचे आणि जिल्हा बंदी करण्याचे काम हे उद्धव ठाकरे सरकारच करु शकते
- गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगावे, त्यांनी आणि त्यांच्या पोलिसांनी मला गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीपासून वंचित ठेवण्यात आले. मला 6 तास घरात कोंडून ठेवले. त्यानंतर माझ्या वकिलांनी विनंती केल्यानंतर मला गणेश विसर्जनासाठी परवानगी देण्यात आली.
- मला सीएसटीएमला कोल्हापूरला जाण्यापूर्वी मला धक्काबुक्की केली.
- मला कोल्हापूर जिल्हा बंदी करण्याची ऑर्डर म्हणजे किरीट सोमैयांना घऱाबाहेर पडू देऊ नका असे कुठेच नाही
- उद्धव ठाकरे तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल, मला बेकायादेशीर डांबून ठेवणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे
- या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहे. तसेच मुंबई पोलिसांनी बनावट आदेश काढले, त्यांच्यावर कारवाई करावी
- माझ्या जीवाला धोका असल्याची माहिती तुम्हाला होती तर ती तुम्ही संबंधित यंत्रणांना का दिली नाही, याचे उत्तर वळसे पाटील यांनी द्यावे
- एनसीपीचे कार्यकर्ते गुंड आहेत का?
- 2700 पानांची ईडीकडे तक्रार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात केली आहे. त्याची चौकशी सुरू झाली आहे. त्या संबंधित कागदपत्रे देणार आहे
- शिवसेने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मला आंबाबाईचे दर्शऩ करायला परवानगी नाही, आणि मुश्रीफ यांच्या स्वागताला परवानगी कशी
- मुश्रीफांच्या चौकशीच्या भीतीने माझ्यावर हल्ला करण्यात आला का?
- अप्पासाहेब नलाव़डे सहकारी साखऱ कारखान्यात मुश्रीफ कुटुंबीयांचा 100 कोटींचा घोटाळा
09:03 September 20
पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडल थांबवले 9 वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणारं, असल्याचे सोमैयांनी म्हटले आहे
07:00 September 20
किरीट सोमैया कराडमध्ये घेणार पत्रकार परिषद
कोल्हापूरला जाणाऱ्या किरीट सोमैयांना कराड मध्ये अडवून पोलिसांनी ताब्यात घेत पुढील प्रवास करण्यास रोखले आहे. पोलिसांच्या विनंतीनंतर सोमैया यांनी कोल्हापूरचा दौरा रद्द केला आहे. दरम्यान सोमैया मुंबईला जाण्यापूर्वी या सर्व घडामोडींवर कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
06:54 September 20
एका व्यक्तीने तीन चोरांचे सरकार हलवून टाकले, किरीटजी आपण लढत रहावे - निलेश राणे
किरीट सोमैया यांनी महाविकास आघाडीची इतकी वाट लावली की राज्य सरकारला त्यावर उत्तर मिळत नाही. एका व्यक्तीने तीन चोरांचे सरकार हलवून टाकले आहे. यावरून किरीट सोमय्या यांची उंची कळते आणि ठाकरे सरकारची लायकी कळते. किरीटजी आपण असेच लढत राहावे, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी किरीट सोमैयांना पाठिंबा दर्शवत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
06:31 September 20
किरीट सोमैया कराडमधून मुंबईकडे परतणार
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमैयांना जिल्ह्यात येण्यास परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांनी सोमैयांना कराडमधून ताब्यात घेतले. त्यानंतर सोमैया हे आज कराडमधून मुंबईकडे माघारी जाणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर दौऱ्याचे सोमैयांच्या राजकीय नाट्याला तूर्तास ब्रेक लागला आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोमैया यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
06:29 September 20
किरीट सोमैयांना कराडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले, मुंबईकडे परतणार
महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईला जाणाऱ्या किरीट सौमैयांना रविवारी रात्री पोलिसांनी कराड स्थानकांवर अडवले आणि त्यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखले आहे. त्यानंतर सोमैया कराडच्या विश्राम गृहात दाखल झाले होते.
06:28 September 20
किरीट सोमैया रविवारी रात्री मुंबईतून कोल्हापूरकडे रवाना झाले होते. कराडमध्ये अडवले
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांना त्यांना अडवलं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली. महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
06:14 September 20
कोल्हापूरकडे जाण्यास मज्जाव, मुंबईला परतणार सोमैया
मुंबई - भाजप नेते किरीट सोमैय्या यांना कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. सोमैया आज कोल्हापूरला भेट देणार होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तरीही रविवारी रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट कोल्हापूरला जाण्यास निघाले होते. त्यानंतर त्यांना कराडमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. त्यानंतर मुश्रीफ यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान किरीट सोमैयाच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध करत राष्ट्रवादीच्या समर्थकांनी आंदोलनाची तयारी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमैय्यांना कोल्हापुरात येण्यास विरोध केला होता. कोल्हापुरात कलम 144 लागू कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कलम 144 लागू केले असून, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे.