ETV Bharat / state

2024 ची विधानसभा निवडणूक भाजपच जिंकणार - समरजित घाटगे

author img

By

Published : Jul 6, 2023, 5:43 PM IST

अजित पवार यांनी रविवारी घेतलेल्या शपथविधीनंतर कोल्हापूर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाराज असल्याची चर्चा होती. चार दिवसांपासून ते नॉट-रिचेबल असल्याचीही चर्चा होती. आज कागलमध्ये मेळावा घेऊन समरजित घाटगे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक भाजपकडूनच लढणार. तसेच भाजपच राज्यात निवडणूक जिंकणार असा निश्चय भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केला आहे.

Samarjit Ghatge
Samarjit Ghatge

कोल्हापूर : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला राष्ट्रवादीतील अजित पवार गटाने समर्थन दिल्यानंतर राज्यात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. या शपथविधीमध्ये पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. कागल मतदार संघातील घाटगे यांचे कट्टर विरोधक हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर कोल्हापूर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन घाटगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आज कागल शहरात कागल मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन समरजीतसिंह घाटगे यांनी आपली भूमिका मांडली.

फडणवीस, चंद्रकांतदादा माझे राजकीय गुरू : रविवारी शपथविधीनंतर 'मी' तातडीने मुंबईसाठी निघालो होतो. मात्र, सातारापर्यंत पोहोचल्यावर मला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे फोन आले. यामुळे 'मी' फोन स्विच ऑफ केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सातत्याने संपर्कात होतो. फडणवीस यांच्याकडे एकतास चर्चा झाली. गुरुपौर्णिमेला त्यांच्याकडे गेलो होतो. फडणवीस आणि चंद्रकांतदादा माझे राजकीय गुरू आहेत, असेही घाटगे यावेळी म्हणाले.

'मी' पार्टी सोडायची का? : गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे काम मतदारसंघात करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे स्वप्न 'मी' घराघरात पोहोचवले आहे. मी मूळचा भाजपचा असल्याने आत्ता येणाऱ्या निवडणुकीसाठी मी पक्ष सोडायचा का? असा सवालही घाटगे यांनी यावेळी उपस्थित केला.

'मी' गुरु बदलणारा माणूस नाही : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्वागत आहे. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची प्रचारासाठी मदत होईल. सत्तेसाठी राज्यातील अनेक नेत्यांनी गुरू बदलले, असा टोलाही घाटगे यांनी यावेळी लगावला. आमदार होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा कार्यकर्त्याचा निश्चय. कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील संदीप कांबळे या कार्यकर्त्याने गेली सहा महिने पायात चप्पल घातलेली नाही. 2024 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर माझ्या स्वखर्चाने कार्यकर्ता संदीप कांबळे यांच्या पायात 'मी' चप्पल घालीन असे घाटगे म्हणाले.

हेही वाचा - Political Crisis In NCP : शरद पवारांनी दिल्लीत बोलावलेली बैठक बेकायदेशीर, अजित पवारांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.