कोल्हापूर - अश्लील सीडी समोर आल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत कर्नाटकचे जलसंपदामंत्री तसेच बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची अश्लील सीडी समोर आली होती. त्यानंतर विरोधकांकडून अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आले. त्यानंतर जारकीहोळी यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
आज (3 मार्च) वरिष्ठांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी आपल्या मंंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, जारकीहोळी यांच्याविरोधात सर्वच स्तरातून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. मात्र, आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाल्यानंतर रमेश जरकीहोली यांनी पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश घ्यावा, अशी अट घालून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजते.
काय आहे प्रकरण
नोकरीच्या आमिषाने बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळी यांनी हा आरोप केला असून, त्यांनी याबाबतची एक सीडी सुद्धा जाहीर केली आहे. या प्रकारानंतर कर्नाटकच्या राजकारणात नवा भूकंप निर्माण झाला आहे. दरम्यान, काही ठिकाणी जारकीहोळी यांच्या विरोधात निदर्शने सुद्धा करण्यात येत आहेत. दरम्यान या सीडीमध्ये दिसणारे रमेश जारकीहोळीच आहेत की अन्य कोण आहे हे स्पष्ट होणे गरजेचे असून, संबंधित मंत्र्यांच्या चौकशीची सुद्धा कळहली यांनी मागणी केली आहे.
...तर मला फाशी द्या - जारकीहोळी
कुलहळ्ळी या व्यक्तीला मी ओळखत नाही. ती युवती कोण मला माहिती नाही. मला त्या सीडीची ही कोणतीच माहिती नाही. असे घाणेरडे कृत्य आपण करणार नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊ द्या. चूक असल्यास मला फाशी द्या, अशी प्रतिक्रिया रमेश जारकीहोळी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.
हेही वाचा - कोरोना काळात साहित्य खरेदीमध्ये 35 कोटींचा भ्रष्टाचार; जि.प. सदस्य निंबाळकरांचा आरोप