कोल्हापूर - कोरोना विषाणूची भीती आता संपूर्ण राज्यात पसरली आहे. गुजरीमध्ये गाडीवरून जाताना शिंकल्यामुळे एकाला बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात दारुच्या नशेत मुलाकडून आईची हत्या
कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा आकडा महाराष्ट्रात 47 वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी शहरातील गर्दीवर नियंत्रण आणले जात आहे. अशात अनेकजण कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी काळजी घेत आहेत. अनेकजण मास्कचा वापर करत आहेत. मात्र, गुजरीमध्ये शिंकताना तोंडाला रूमाल न लावल्यामुळे वाद होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
कोल्हापुरातील गुजरीमध्ये दुचाकीवरून जात असतारा एक व्यक्ती जोरात शिंकला. त्यावेळी शेजारून जाणाऱ्या दुचाकीस्वाराने मास्क तरी वापरा, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : गारगोटीत पार पडला केवळ 20 ते 25 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा