कोल्हापूर - राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरच्या विभागीय भरारी पथकने सुमारे 5 लाख 31 हजार 440 रुपयाची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गाडीचा पाटलाग करत जिल्ह्यातील सिद्धनेर्ली गावच्या हद्दीत पथकाने दोन गाड्या पकडल्या. या कारवाईच सुमारे 19 लाख 96 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्या वतीने करण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक होत असते. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाकडून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी सुरू आहे. 12 डिसेंबर रोजी कुडाळ नाजिक बिबवणे गावच्या हद्दीत गोवा-मुंबई महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू असताना एक चारचाकी वाहन (MH 01 BB 2516) या चालकाने गाडी न थांबवता भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत गाडी सुसाट वेगाने पुढे नेली. या वाहनाचा पाठलाग करत सिद्धनेर्ली गावच्या हद्दीत निढोरी कागल रोड कोल्हापूर येथे दोन चारचाकी वाहने पकडली वाहन क्रमांक MH01BB2516 आणि MH07H2185 या वाहनात फक्त गोवा राज्यात विक्री करता परवानगी असलेल्या तब्बल 5 लाख 31 हजार 440 रुपये किंमतीच्या व गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या मद्याचा साठा आढळून आला. तर संशयित आरोपींवर त्वरित कारवाई करत प्रकाश सावंत (वय 33) व अक्षय घाडीगावकर (वय 26, दोघे राहणार सिंधुदुर्ग) या दोघांस ताब्यात घेत वाहनासह एकूण 19 लाख 96 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक कोल्हापूर विभागाकडून करण्यात आली आहे. विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क यशवंत पवार, अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी आर पाटील, दुय्यम निरीक्षक आर. के. गुरव इचलकरंजी, आर. जी येवलुजे, के. डी. गुरव कोळी तसेच कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल जाधव, दिपक कापसे, बळीराम पाटील, शिवलिंग कंठे, संदीप माने यांच्या पदकाने ही कारवाई केली.