ETV Bharat / state

'...अन्यथा 29 ऑक्टोबरला पुण्यातील लाल महालावर धडक देण्याचा निर्धार'

सरकारने १० दिवसांत ठोस पावले न उचल्यास २९ ऑक्टोबरला सकल मराठा समाज ताकतीने पुणे येथे वाहनाने लालमहालात धडक देणार आहे.

kolhapur
सारथी संस्थेच्या बचावासाठी पुण्यातील लाल महालावर धडक
author img

By

Published : Oct 15, 2020, 10:51 PM IST

कोल्हापूर - सारथी संस्थेच्या बचावासाठी शासनाने येत्या दहा दिवसांत ठोस पावले उचलावीत अन्यथा 29 ऑक्टोंबरला पुण्यातील लाल महालावर धडक देण्याचा निर्धार आज सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. मराठा आरक्षण मिळावे, त्या बरोबरच सारथी संस्थेला स्वायत्ता मिळावी, तसेच मराठा समाजाच्या अन्य मागण्यासाठी लाल महल ते लाल किल्ला अशी लढाई लढावी लागणार आहे. मात्र, ही लढाई यशस्वी होण्यासाठी त्याचे योग्य नियोजन करा, असे आवाहनही यावेळी खासदार संभाजीराजे यांनी या बैठकीत केले.

सारथी संस्थेच्या बचावासाठी पुण्यातील लाल महालावर धडक

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज प्रमुख समन्वयकांची बैठक कोल्हापुरात पार पडली. शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवेळी खासदार संभाजीराजे, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आवाडे, सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शाहू महाराज यांनी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या सर्वच पक्षांमध्ये मराठा समाजाचे लोक प्रतिनिधित्व करतात. मात्र या लोकांनी राजकीय पक्ष, गट-तट बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

मराठ्यांच्या मुलांनी विविध क्षेत्रात पुढे आले पाहिजे. शिवाय आरक्षणाच्या मागणीवर भिन्न-भिन्न दिशेने विचार सुरू आहेत. हे थांबवून सर्वांनी आरक्षणाच्या मागणीवर एकत्र येण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिवाय मराठ्यांनी एकत्र येऊन नेतृत्व सिद्ध केले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. 1902 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली, यामध्ये मराठा समाजाचाही समावेश असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. 15 टक्के मराठा समाज आजही आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. ईएसडब्ल्यूचा लाभ उठवल्यास मराठा आरक्षणाच्या मागणीला धोका निर्माण होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. चाळीस वर्ष आरक्षणाचा हा लढा सुरू असून आता मागे न हटण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लाल महाल ते लाल किल्ला ही लढाई लढायची असली, तरी त्याचे योग्य नियोजन करूनच दिल्लीला पोहचूया. या लढाईत गडबड करून चालणार नाही. नियोजन करून आणि वेळ बघून दिल्लीवर धडक देऊया असे आवाहनही खासदार संभाजीराजे यांनी केले. याशिवाय सारथीसाठी केवळ निधीची घोषणा केली जात आहे. मात्र, हा निधी अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे सारथीची स्वायत्ता राहिली पाहिजे, या संस्थेला निधी द्या, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देखील खासदार संभाजीराजे यांनी दिला.

साडेचारशे कोटी मराठयांचा प्रश्न आहे. त्यामुळ बार्टीप्रमाणेच मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेला स्वायत्ता मिळावी, अशी मागणी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांनी केली. सारथी संस्थेचे अनेक हक्क अधिकार संपुष्टात आलेत, त्यामुळे एकंदरीत मराठा समाजाला यातून होणारे लाभ मिळत नाहीत. परिणामी सारथी संस्थेला स्वायत्ता मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा इशाराही मुळीक यांनी दिला. १९ ऑक्टोबररोजी राज्य सरकारला सारथी संस्थेची स्वायत्ता आणि अन्य मागण्यांसाठी निवेदन देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. या निवेदनातील मागण्याची पूर्तता सरकारने १० दिवसांत न केल्यास २९ ऑक्टोबरला सकल मराठा समाज ताकतीने पुणे येथे वाहनाने लालमहालात जाणार आहे. याठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होऊन आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येईल. या नंतर मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत होणाऱ्या आंदोलनाची जबाबदारी सरकारची राहील, असा इशाराही वसंतराव मुळीक यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.