ETV Bharat / state

Agitation For Sugarcane Rate : कोल्हापुरात ऊस दर आंदोलन पेटलं, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना लावल्या आगी - स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन

Agitation For Sugarcane Rate : ऊसाला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन उभारण्यात आलं आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana Agitation) आज (सोमवारी) या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. ज्यामध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसाचे ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या पेटवून दिल्या. मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची दिलाय.

Agitation For Sugarcane Rate
ऊस दर आंदोलन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 4:02 PM IST

ऊस दर आंदोलनावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

कोल्हापूर Agitation For Sugarcane Rate : गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला जादा चारशे रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा, यंदाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्ह्यात आंदोलन (Sugarcane Rate Agitation in Kolhapur District) सुरू आहे. ऐन दिवाळीत आता या आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण लागत आहे. आंदोलकांकडून ठिकठिकाणी ऊसाचे ट्रॅक्टर, ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या पेटवून देण्याचा प्रयत्न होत आहे. आज शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे दत्त कारखान्याच्या ऊसतोडी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखल्या. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी (Farmers Leader Raju Shetty) यांनी केलेल्या मागण्यांवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.

राजू शेट्टींची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड? : 22व्या ऊस परिषदेमध्ये झालेल्या ठरावानुसार यंदाच्या गळीत हंगामात पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी, अशी मागणी केली गेली. यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी जयसिंगपूर येथे ठिय्या आंदोलन करत आहेत. ऐन दिवाळीत हे आंदोलन सुरू असल्यामुळे रविवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला पाहिजे, अशी भूमिका मांडली; मात्र राजू शेट्टी यांचे विरोधक आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वाभिमानी दूध संघाच्या दरावरून शेट्टींना लक्ष्य केलं. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी राजू शेट्टी धडपडत आहेत, अशी टीका केली होती.

तर लोकसभेची निवडणूक लढवणार नाही : आवडे पिता पुत्रांच्या ताब्यात असलेल्या जवाहर कारखान्याकडून शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे रुपये दर दिल्यास मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतो, अशी जाहीर भूमिका राजू शेट्टींनी मांडली. यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत ऊसतोडी सुरू आहेत त्या ठिकाणी जाऊन ऊस तोडी बंद पाडल्या. रविवारी मध्यरात्री जिल्ह्यात ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांचे टायर पेटवून देण्याचे प्रकार घडले. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला जिल्ह्यात आता हिंसक वळण लागत आहे.

फडणवीसजी हा कसला न्याय? :17 नोव्हेंबरला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, शेतकरी आपल्या हक्काचे चार पैसे मागत आहेत. त्यांना संरक्षण देण्याऐवजी कारखानदारांना गृहमंत्रालयाकडून पोलीस संरक्षण मिळत आहे. मग, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी हा कसला न्याय? असा सवाल स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय.

हेही वाचा:

  1. Vijay Wadettiwar Death Threat: विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी, गृहमंत्र्यांना पत्र लिहून 'ही' केली मागणी
  2. Sanjay Raut vs Nitesh Rane : नितेश राणे-संजय राऊत टीका करताना 'कमरेखाली' घसरले, काढली एकमेकांची 'अंतर्वस्त्र'
  3. Ravikant Tupkar Diwali Celebration: शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी शेतात सोयाबीन, कापूस पूजन करुन केली दिवाळी साजरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.