ETV Bharat / state

... आणि आदित्य ठाकरे झाले निरुत्तर - पूरग्रस्त भागाची पाहणी

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी प्रथम कोल्हापुरातील बापट कॅम्प या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर येथील आंबेवाडी आणि चिखली या 2 पूरग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी आंबेवाडी येथील मारुती मंदिरामध्ये एका महिलेने शासनाची आम्हा भाडेकरूंना मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यावर, आदित्य ठाकरे निरुत्तर झाले.

आदित्य ठाकरे
author img

By

Published : Aug 20, 2019, 5:02 PM IST

Updated : Aug 20, 2019, 6:04 PM IST

कोल्हापूर - राज्य शासनाने पूरग्रस्तांना मदत जाहीर केली असून प्राथमिक स्वरुपात 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मदत वाटपाचे काम सुरू आहे. यावेळी, ज्या घरात आमच्यासारखे भाडेकरू राहतात त्यांना मदत मिळत नाही. शिवाय आमच्याकडे रेशन कार्डसुद्धा नाही त्यामुळे आम्ही काय करावे, असा प्रश्न एका महिलेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विचारला असता ते निरुत्तर झाले. तर, शेजारीच असेलेले आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वेळ मारून नेत आपल्याला सुद्धा मदत मिळेल, आम्ही तसे तहसीलदारांना सांगतो, असे आश्वासन दिले.

महिलेच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे निरुत्तर

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी प्रथम कोल्हापुरातील बापट कॅम्प या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. ठाकरे यांनी पाण्याच्या टाक्या तसेच एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले. शिवाय शिवसेना आपल्या पाठीशी आहे, असा धीरसुद्धा दिला. त्यानंतर येथील आंबेवाडी आणि चिखली या दोन पूरग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी आंबेवाडी येथील मारुती मंदिरामध्ये एका महिलेने शासनाची आम्हा भाडेकरूंना मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यावर, आदित्य ठाकरे निरुत्तर झाले. तर, एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच मदत मिळेल आणि रेशन कार्ड नसेल तरीही मदत मिळेल, असे वेळ मारून नेत आश्वस्त केले.

मात्र, शासनाचे अशाप्रकारे मदत करण्याबाबत दोन आदेश आहेत. यामध्ये सूसुत्रतेचा अभाव असल्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे. शिवाय सुधारित आदेश निघणार असल्याचेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर कृती कितपत होणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Intro:राज्य शासनाने पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. प्राथमिक स्वरूपात 5 हजार रुपयांची सानुग्रह अनुदान मदत वाटपाचे काम सुरू आहे. पण ज्या घरात आमच्यासारखे भाडेकरू राहतात त्यांना मदत मिळत नाहीये. शिवाय आमच्याकडे रेशन कार्ड सुद्धा नाहीये त्यामुळे आम्ही काय करावे, असे एका महिलेने विचारले असता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निरुत्तर झाले. शेजारीच असेलेले आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वेळ मारून नेऊन आपल्याला सुद्धा मदत मिळेल आम्ही तसे तहसीलदारांना सांगतो असे आश्वासन दिले. आदित्य ठाकरे यांनी आज प्रथम कोल्हापूरातील बापट कॅम्प या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. ठाकरे यांनी पाण्याच्या टाक्या तसेच एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले. शिवाय घाबरून न जाता शिवसेना आपल्या पाठीशी आहे असा धीर सुद्धा दिला. त्यानंतर येथील आंबेवाडी आणि चिखली या दोन पुरग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी आंबेवाडी येथील मारुती मंदिरमध्ये एका महिलेने शासनाची आम्हा भाडेकरूंना मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यावर आदित्य ठाकरे निरुत्तर झाले. यावर एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच मदत मिळेल आणि रेशन कार्ड नसेल तरीही मदत मिळेल असे वेळ मारून नेत आश्वस्त केले. मात्र शासनाचे अशा प्रकारे मदत करण्याबाबत दोन आदेश आहेत. यामध्ये सुसूत्रतेचा अभाव असल्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे. शिवाय सुधारित आदेश निघणार असल्याचेही काही अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे. त्यामुळे मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर कृती कितपत होणार यावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

Body:.

Conclusion:.
Last Updated : Aug 20, 2019, 6:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.