कोल्हापूर : अशा प्रकारच्या घटना समोर येतात तेव्हा संबंधित व्यक्तीने पोलिसांना माहिती देणे गरजेचे असते. मात्र या प्रकरणामध्ये काहींनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. शिवाय पोलिसांना याची तात्काळ माहिती दिली नाही. त्यामुळे संबंधितांवरसुद्धा कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी इशारा दिला आहे.
2 वर्षांपासून सुरू होते गैरकृत्य : कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातील शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाने नववी आणि दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यातील काही मुलींसोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असून याबाबत संबंधित पीडित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबतची तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षक पुन्हा मुलींना धमकी देण्याचे प्रकार करू लागला. यामुळे मुख्याध्यापकांनी तातडीने येथील गावच्या पोलीस पाटलांना बोलवून घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र यावेळी संबंधित शिक्षक हा शाळेत आलाच नाही. यामुळे गावकऱ्यांनी त्याची उचलबांगडी करण्याची मागणी केली होती. शिवाय त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित शिक्षकाचे सातारा जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश मुख्याध्यापकांनी देत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपी शिक्षकाच्या या कृत्यामुळे पालकांमध्ये रोष वाढत आहे.
मुलींच्या खिशात हात घालून गैरकृत्य: संबंधित शिक्षक हा शाळेतील नववी दहावीत शिकणाऱ्या वीस ते पंचवीस मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवतो. त्यांच्या खांद्यावर हात टाकतो, खिशात हात घालत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली होती. आलेल्या तक्रारीनुसार त्वरित मुख्याध्यापकांना सदर शिक्षकाचे बदली करण्याचे आदेश दिले. यापुढे संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करू, असे गावच्या पोलीस पाटलांनी म्हटले आहे. आज शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
घडलेला प्रकार निंदनीय : या शाळेत घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून समुपदेशन करण्यासाठी आले. यावेळी मुलींनी हा प्रकार मला सांगितला. सध्या या शिक्षकाची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली. तरी तेथील मुलींना देखील हा अशाच प्रकारचा त्रास देईल, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या शिक्षकावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, शिवाय त्याला निलंबन करण्याची सुद्धा गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी म्हटले आहे.