कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 48 तासांत जिल्ह्यात तब्बल 1 हजार 263 नवे रुग्ण, तर 56 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय 532 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 555 वर पोहचली आहे. आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 58 हजार 583 इतकी झाली आहे.
हेही वाचा - 'रेमडेसिवीर'चा काळा बाजार; एका इंजेक्शनची विक्री 18 हजारांना, दोघे गजाआड
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंतची एकूण रुग्णांची संख्या 57 हजार 320 वर पोहचली आहे. त्यातील 51 हजार 557 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर, एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 555 वर पोहचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 939 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
1 वर्षाखालील - 72 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2142 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 4100 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 31493 रुग्ण
51 ते 70 वर्ष -16581 रुग्ण
71 वर्षांवरील - 4195 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 58 हजार 583 कोरोना रुग्ण आहेत.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
1) आजरा - 1086
2) भुदरगड - 1423
3) चंदगड - 1309
4) गडहिंग्लज - 1787
5) गगनबावडा - 171
6) हातकणंगले - 5927
7) कागल - 1830
8) करवीर - 6577
9) पन्हाळा - 2131
10) राधानगरी - 1362
11) शाहूवाडी - 1510
12) शिरोळ - 2750
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 8390
14) कोल्हापूर महानगरपालिका - 19194
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 3136
हेही वाचा - गोकुळ दूधसंघाची निवडणूक; उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस