ETV Bharat / state

कोल्हा'पूर' स्थिती गंभीर; ४ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले - पन्हाळा

गेल्या १० दिवसांपासून कोल्हापुरात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून प्रतिसेकंद ११ हजार ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात केल्या जात आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

कोल्हा'पूर' स्थिती गंभीर; ४ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
author img

By

Published : Aug 5, 2019, 10:23 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात पुराची स्थिती आणखीनच गंभीर होत चालली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक सखल भागात आणि नदीकाठच्या गावात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

कोल्हा'पूर' स्थिती गंभीर; ४ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

गेल्या १० दिवसांपासून कोल्हापुरात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून प्रतिसेकंद ११ हजार ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात केल्या जात आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्यांची पाणीपातळी ४६.४ इंचापर्यंत पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण ९५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण प्राधिकरण आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहे.

कोल्हापुरातील कुंभार गल्लीत शिरले पाणी -

शाहूपुरीतील अनेक घरांना पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांचे अंबाबाई विद्यालयात हलवण्यात आले आहे. पाणी झपाट्याने वाढत असल्यामुळे येथील कोंडा ओळ ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद झाला आहे. जयंती नाल्याचे पाणी एक ते दीड फूटापर्यंत रस्त्यावर आले आहे. शिवाय लक्ष्मीपुरीतील आपत्ती कक्षाला देखील पुराच्या पाण्याने वेडा घातला आहे. शिवाय अग्निशमन दलाच्या कार्यालयात सुद्धा पाणी शिरले आहे.

पन्हाळा तालुक्यातील तीन गावांचा संपर्क तुटला -
पन्हाळा तालुक्यातील माळवाडी पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे माळवाडी, तिरपन, दिगवडे या तीन गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. दिगवडे येथील नवीन पुलाच्या अलीकडे पाणी आले आहे. तसेच आता माळवाडीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या तीन गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

Intro:अँकर : कोल्हापूर जिल्ह्यात पुराची स्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. गेल्या दहा दिवसांहुन अधिक काळ कोल्हापूरात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. शिवाय राधानगरी धरणाचे स्वयंचलित सतही दरवाजे उघडले असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदी धोक्‍याच्या पातळीवरती वाहत असून शहरासह जिल्ह्यातील अनेक सखल भागांत आणि नदी काठच्या गावात पुराचं पाणी शिरलं आहे. राजाराम बंधाऱ्याची पाण्याची पातळीत सुद्धा आता 46.4 इंच इतकी पोहोचली आहे. जिल्ह्यातील चारशेहून अधिक कुटुंबातील 4 हजारहुन अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण 95 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सर्व आपत्तीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण प्राधिकरण सज्ज झाले असून त्यांच्या समोर मोठे आव्हान आहे.Body:राधानगरी धरणाचे सर्वच दरवाजे उघडले

-राधानगरी धरणाचे रात्री सातही दरवाजे उघ दरवाजे उघडल्याने आता धरणातून प्रतिसेकंद 11400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे.

कोल्हापुरातील कुंभार गल्लीत शिरले पाणी ; अनेक घरांत पाणी

पावसाच्या हाहाकाराचा फटका शाहूपुरीतील अनेक घरांना बसला आहे. त्यामुळे त्यांचे येथील अंबाबाई विद्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. पाणी झपाट्याने वाढत असल्यामुळे येथील-कोंडा ओळ ते व्हिनस काँर्नर रस्ता बंद झाला आहे. जयंती नाल्याचे पाणी एक ते दीड फूट रस्त्यावर आले आहे. शिवाय लक्ष्मीपुरीतील आपत्ती कक्ष पुराच्या पाण्याच्या वेड्यात असून अग्निशमन च्या कार्यालयात सुद्धा पाणी घुसले आहे.

पन्हाळा तालुक्यातील या तीन गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला

-पन्हाळा तालुक्यातील माळवाडी पुलावर पाणी आल्याने आता माळवाडी, तिरपन, दिगवडे या तीन आता गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. दिगवडे नवीन पुलाच्या अलीकडे पाणी आलं आहे आणि आता माळवाडीच्या पुलावर सुद्धा पाणी आले आहे. त्यामुळे या तीन गावांचा आता पूर्णपणे संपर्क तुटला आहे. Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.