ETV Bharat / state

कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; दुसऱ्यांदा जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली - कोल्हापूर बंधारे न्यूज

कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील 28 बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहे. राधानगरी धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणातून अकराशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक 104 मिमी पाऊस आजरा तालुक्यात झाला आहे.

Rajaram Dam
राजाराम बंधारा
author img

By

Published : Jul 8, 2020, 3:00 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राधानगरी धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणातून अकराशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील 28 बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहे.

कोल्हापूरातील २८ बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली

पंचगंगा नदीची पाणीपातळीत कमालीची वाढ सुरू असून सद्यस्थितीत कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 22 फुटांवर पोहोचली आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील दोन वाहतूक मार्गसुद्धा बंद झाले आहेत. गेल्या 24 तासात सर्वाधिक 104 मिमी पाऊस आजरा तालुक्यात झाला आहे.

सध्या पाण्याखाली असलेले बंधारे -

पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड.

वारणा नदी : चिंचोली, राशिवडे, हळदी, सरकारी कोगे आणि खडक कोगे.

वेदगंगा नदी : मसवे, शेळोली, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली

हिरण्यकेशी नदी : साळगाव, निलजी व ऐनापूर

घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर भोगोली, हिंडगाव व कानडे सावर्डे

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा(दस लक्ष घन मीटरमध्ये) -

तुळशी 44.63 दलघमी, वारणा 472.95 दलघमी, दूधगंगा 361.32 दलघमी, कासारी 38.01 दलघमी, कडवी 30.35 दलघमी, कुंभी 39.61 दलघमी, पाटगाव 52.70 दलघमी, चिकोत्रा 18.30 दलघमी, चित्री 18.39 दलघमी, जंगमहट्टी 13.70 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे 6.06 दलघमी.

जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणी पातळी खालीलप्रमाणे -

राजाराम 21.5 फूट, सुर्वे 22 फूट, रुई 50.9 फूट, इचलकरंजी 48 फूट, तेरवाड 42 फूट, शिरोळ 33.6 फूट, नृसिंहवाडी 29 फूट, राजापूर 18.6 फूट

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला आणि आत्तापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये खालीलप्रमाणे -

हातकणंगले- 10 एकूण 149.13 मिमी, शिरोळ- 9.71 एकूण 139.86 मिमी, पन्हाळा-28.86 एकूण 467.57 मिमी, शाहूवाडी- 37 एकूण 662.33 मिमी, राधानगरी- 65 एकूण 662.50 मिमी, गगनबावडा-98 मिमी एकूण 1630.50 मिमी, करवीर- 13.18 एकूण 358 मिमी, कागल- 46.57 एकूण 459.43 मिमी, गडहिंग्लज- 49.43 एकूण 320.71 मिमी, भुदरगड- 47.40 एकूण 541.40 मिमी, आजरा- 104.25 एकूण 747.50 मिमी, चंदगड-85.50 मिमी असा एकूण 692.17 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.