जालना - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जालन्यात युवा सेनेने राणे यांचा विरोधात निदर्शने केले आहे. अंबड चौफुली चौकात हे निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात राणे यांच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी राणे हे मलईदार पदासाठी मुख्यमंत्र्यांवर टीका करत असल्याचा आरोप यावेळी केला आहे. तसेच, यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी येथील पोलिस स्टेशनमध्ये आपले निवेदन दिले आहे.
जालना येथे नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा युवा सेनेकडून निषेध
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जालन्यात युवा सेनेने राणे यांचा विरोधात निदर्शने केले आहे. अंबड चौफुली चौकात हे निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात राणे यांच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.