ETV Bharat / state

राजकारणात गावकऱ्यांचा जातोय जीव, जालन्यात पाण्याच्या हंड्यासह महिला दुसऱ्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयात - collector office jalna

पाण्यासाठी दोन दिवसानंतर पुन्हा महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जालना
author img

By

Published : May 27, 2019, 10:58 PM IST

जालना - राजकारणातील शह-काटशहामुळे जालना तालुक्यातील पुणेगाव येथील ग्रामस्थांचा पाण्याविना जीव जाण्याची वेळ आली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच या गावच्या महिलांनी डोक्यावर हांडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला होता. आश्वासनानंतर ते परतले, त्यानंतर फक्त पाण्याचा एक टँकर मिळाला आणि परत बंद झाला.या प्रकारामुळे त्याच महिलांनी आज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

जालना
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावची सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आहे आणि तालुक्याचे राजकारण हे शिवसेनेकडे आहे. पंचायत समितीचे सभापतीदेखील शिवसेनेचे आहेत त्यामुळे सरपंचाने वारंवार विनंती करूनही राजकारणाच्या शह-काटशहात हे टँकर अडकले आहे. त्यामुळे दिनांक 24 मे रोजी याच गावच्या महिलांनी डोक्यावर हांडे घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला होता. मात्र, टॅंकरचे आश्वासन मिळाल्यामुळे त्या गावाकडे परतल्या. गावाकडे गेल्यानंतर एक टॅंकर आल्याचे या महिला सांगत आहेत. त्या टँकरमुळे गावाची तहान भागत नाही, त्यामुळे आज (सोमवार दि. 27) याच महिलांनी पुन्हा डोक्यावर हांडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि आपला संताप व्यक्त केला. त्यांची समजूत काढण्यासाठी जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे हे देखील तेथे उपस्थित होते. काल टँकर पाठवले होते, मात्र ते रस्त्यात नादुरुस्त झाल्यामुळे पोहोचू शकले नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या बोलण्यावर गावकऱ्यांचा काही विश्वास बसण्यास तयार नाही.

Intro:राजकारणातील शह कटशहा मुळे जालना तालुक्यातील पुणेगाव येथील ग्रामस्थांचा पाण्याशिवाय जीव जाण्याची वेळ आली आहे. अवघ्या दोन दिवसापूर्वीच या गावच्या महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला होता. मात्र आश्वासनानंतर ते परतले त्यानंतर फक्त एक टँकर मिळाले आणि परत बंद झाले .या प्रकारामुळे त्याच महिलांनी आज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

Body:या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावची सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आहे ,आणि तालुक्याचे राजकारण हे शिवसेनेच्या हातात आहे. पंचायत समितीचे सभापती देखील शिवसेनेचे आहेत त्यामुळे सरपंचाने वारंवार विनंती करूनही राजकारणाच्या शह कातशहात मध्ये हे टँकर अडकले आहे. त्यामुळे दिनांक 24 मे रोजी याच गावच्या महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला होता. मात्र टॅंकरचे आश्वासन मिळाल्यामुळे त्या गावाकडे परतल्या. गावाकडे गेल्यानंतर एक टॅंकर आल्याचे या महिला सांगत आहे. त्या टँकर मुळे गावाची तहान भागत नाही ,त्यामुळे आज सोमवार दिनांक 27 रोजी याच महिलांनी पुन्हा डोक्यावर हंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आणि आपला संताप व्यक्त केला. त्यांची समजूत काढण्यासाठी जालना पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे हे देखील तेथे उपस्थित होते. काल टँकर पाठवले होते मात्र ते रस्त्यात नादुरुस्त झाल्यामुळे पोहोचू शकले नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या सांगण्यावर गावकऱ्यांच्या काही विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.