जालना - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज जालना मतदारसंघात मतदान झाले. सकाळी 7 वाजल्यापासून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरूवात झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पाचव्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विलास औताडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी रात्री उशीरा आलेल्या माहितीनुसार जालना लोकसभेसाठी 64.05 टक्के इतके मतदान झाल्याची माहिती आहे.
Live Updates -
- जालना लोकसभेसाठी 64.05 टक्के मतदान
- 05.00 - जालन्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.91 टक्के मतदान
- 03.00 pm- जालनामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 49.40 टक्के मतदान
- 01.00 pm -जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 37.91 टक्के मतदान
- 11.00 am - जालना मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 22.84 टक्के मतदान.
- 09.00 am - जिल्ह्यात पहिल्या दोन तासांत 9.21 टक्के मतदान.
- 07.30 am - रावसाहेब दानवे यांनी बजावला मतदानाचा हक्क
- 07.00 am - जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात.