जालना - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर जोरात सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून जालना तालुक्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतदान यंत्राची तपासणी करून ते सीलबंद करण्यात आले आहे. ही प्रक्रियेला आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडली.
81 ग्रामपंचायतीची होणार निवडणूक -
जालना तालुक्यात 85 ग्रामपंचायत आहेत. त्यापैकी चार ग्रामपंचायतींची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे उर्वरित 81 ग्रामपंचायतींसाठी आता निवडणूक होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या मतदान यंत्राची तयारी सुरू आहे. याकरिता 287 मशीन लागणार आहेत. तसेच वेळेवर काही मशीन नादुरुस्त झाल्या, तर 15 टक्के मशीन राखीव ठेवल्या जातात. त्यानुसार सुमारे 330 मशीन इथे तपासणी करून सीलबंद केल्या जात आहेत.
हे आहेत अधिकारी -
प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, अप्पर तहसीलदार शितल बंडगर, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, नायब तहसीलदार तुषार निकम, यांच्यासह सह अन्य अधिकारी या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. गुरुवार 14 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या मशीन वाटपाला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा - राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसेचे महाराष्ट्र रक्षक पथक