ETV Bharat / state

'विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही' - ashok chavan

मराठा आरक्षण हा विषय महत्त्वाचा आहेच, मात्र यासोबत राज्यात इतरही अनेक महत्त्वाचे विषय आहेत. आरक्षणाचा विषय फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादीत नाही तर सर्वोच्च न्यायालयात अशा अनेक राज्यांचा विषय असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

'विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही'

author img

By

Published : Feb 15, 2021, 11:48 AM IST

Updated : Feb 15, 2021, 12:30 PM IST

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका करणारे शिवसंग्रमाचे नेते विनायक मेटे तसेच नरेंद्र पाटील यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे. राज्यात आरक्षणाप्रमाणे इतरही अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. तेही सोडविण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

'विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही'

इतरही महत्वाचे प्रश्न आहेत
मराठा आरक्षण हा विषय महत्त्वाचा आहेच, मात्र यासोबत राज्यात इतरही अनेक महत्त्वाचे विषय आहेत. आरक्षणाचा विषय फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादीत नाही तर सर्वोच्च न्यायालयात अशा अनेक राज्यांचा विषय आहे. फरक एवढाच आहे की, महाराष्ट्राप्रमाणे इतर कोणत्याही राज्यातील आरक्षणासाठी स्थगिती दिलेली नाही. महाराष्ट्रात स्थगिती मिळाली ही दुर्दैवी बाब आहे. आठ मार्चला या प्रकरणावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी आम्ही तयारी करीत आहोत असे चव्हाण यांनी सांगितले.

मेटे आणि पाटलांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही
विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील हे सध्या अशोक चव्हाण यांच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका करीत आहेत. मात्र त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा सरकारला आम्ही सहकार्य केलं होतं. हे दोघेही मध्ये एक बोलतात आणि बाहेर वेगळेच बोलतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

हेही वाचा - अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण उपसमितीचा राजीनामा द्यावा-विनायक मेटे

Last Updated : Feb 15, 2021, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.