ETV Bharat / state

जालन्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन वाहनधारक होतायेत पसार - नगरपालिका जालना

राज्यात लॉकडाऊन अद्याप संपुर्णपणे रद्द करण्यात आलेले नाही. मात्र, अत्यावश्यक सुविधांना सूट मिळाल्यामुळे जालना शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे दिसत आहेत. हे व्यवहार सुरू झाले असले तरी कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत.

vehicle drivers breaking rules and cheated with municipal employees In Jalna
जालन्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन वाहनधारक होतायेत पसार
author img

By

Published : Jun 20, 2020, 3:47 PM IST

जालना - राज्यात लॉकडाऊन अद्याप संपुर्णपणे रद्द करण्यात आलेले नाही. मात्र, अत्यावश्यक सुविधांना सूट मिळाल्यामुळे जालना शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे दिसत आहेत. हे व्यवहार सुरू झाले असले तरी कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे शहरात दुचाकीवरून फक्त एका व्यक्तीलाच प्रवास करता येईल आणि तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन होत आहे अथवा नाही, हे तपासण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन नागरिक पसार होताना दिसत आहेत.

जालन्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांना फसवून नियम तोडणार वाहनधारक होतात पसार

हेही वाचा... मेळघाटात आणखी एक अघोरी कृत्य; २६ दिवसीय चिमुकलीच्या पोटावर दिले चटके

जालना शहरात विविध चौकांमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी पावती पुस्तक हातात घेऊन उभे आहेत. मात्र नागरिक काही त्यांच्या हाताला लागत नाहीत. सवयीप्रमाणे ते सुसाट वेगाने वाहन चालवत असल्यामुळे ते वाहन पुढे गेल्यानंतर तो दुचाकिवर दोघे आहेत हे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत .आहे .आणि त्याला आवाज देईपर्यंत तो आपले वाहन वळून पळूनही जाता हे .असाच प्रकार मास्क नसलेल्या वाहनचालकांना संदर्भात देखील होत आहे.

हातातील पावती पुस्तक पाहताच लोक या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जात आहेत. खरेतर चार कर्मचारी आणि दोन होमगार्ड असे एका चौकांमध्ये 6 जण उभे असतानाही वाहन धारक यांना सापडू नयेत हे त्या वाहन चालकाचे कसब म्हणायचे चे या कर्मचाऱ्यांचा दिरंगाई पणा ?.यातूनही कोणी सापडलाच तर मास्क न लावल्यामुळे पाचशे रुपये दंड तर दुचाकीवरून दोघेजण जात असल्यामुळे दोनशे रुपये दंड पालिकेच्यावतीने आकारला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.