ETV Bharat / state

आधुनिक भारताच्या ट्रेनची जालन्यातून सुरूवात, राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही - देवेंद्र फडणवीस - वंदे भारत ट्रेन

Vande Bharat Train : आज 30 डिसेंबर 2023 रोजी जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Railway) या आधुनिक रेल्वेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. लोकांच्या मनात राम बसला आहे. तो तुम्ही काढूच शकत नाही असं ते यावेळी म्हणाले.

Vande Bharat train
देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 4:22 PM IST

Updated : Dec 30, 2023, 5:09 PM IST

देवेंद्र फडणवीस ट्रेन उद्घाटनप्रसंगी मत मांडताना

जालना Vande Bharat Train : यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, रेल्वे विभागाने 2014 ते 2023 पर्यंत अत्यंत गतीने प्रगती केली आहे आणि सर्व देशभरात रेल्वे लाईन मोठ्या प्रगतीपथावर आपले काम करत असल्याचं मत यावेळी दानवे यांनी व्यक्त केलं. (Chhatrapati Sambhajinagar) तसंच येणाऱ्या 2024 मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार असून पुन्हा मोठ्या जोमाने ते काम करणार आहेत. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरवणार असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं. तसंच यापूर्वीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला फक्त 1600 कोटी रुपये मिळत होते. मात्र मोदी सरकारमध्ये बारा हजार कोटी रुपयांचे बजेट या रेल्वे विभागाला मिळाले आहे. तसंच 2024 पर्यंत देशातील प्रत्येक भागात रेल्वे लाईनचे विद्युतीकरण होणार असल्याची माहितीसुद्धा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे.

यामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना : भविष्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजी नगर हे इंडस्ट्रियल मॕग्नेट म्हणून तयार होत आहेत आणि ही दोन्ही शहरे भारताची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडली जात असल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला गती मिळणार आहे. तसंच वंदे भारत ही रेल्वे लातूर येथील कोच फॅक्टरीमध्ये बनवण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. राम मंदिरावर आपल्या भावना व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, मी एक कारसेवक म्हणून राम मंदिर झाल्याबद्दल मनापासून समाधानी आहे. जो संघर्ष आम्ही केला त्या संघर्षाचं फळ आम्हा सर्वांना मिळालं आहे. कारण मी अठरा ते वीस वर्षांचा असताना बदायुँ जेलमध्ये राहिलो आहे. ज्यावेळेस गोळीबार झाला तसंच ज्यावेळेस वादग्रस्त इमारत तोडली त्यावेळेस सुद्धा मी त्या ठिकाणी होतो. त्या भावना ते दुःख आम्ही पाहिले आहे. त्यामुळे हा जो सुवर्णक्षण राम मंदिर उद्घाटनाचा आला आहे, तो आम्हा सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण आहे.

फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे : छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे येत असताना बदनापूर येथे आमदार नारायण कुचे यांच्या सप्ताहच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी बदनापूर येथे मराठा आंदोलकांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून ''गो बॅक-गो बॅक आनाजी पंत गो बॅक''च्या घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतलं. या ट्रेन उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राजेश राठोड, बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. 'वंदे भारत'वरुन संभाजीनगर रेल्वे स्थानकावर 'महाभारत'; एकीकडं कार्यकर्ते भिडले, दुसरीकडं नेते चहापानात रमले
  2. रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, मविआ सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणी सापडल्या होत्या वादात
  3. अयोध्येत विकासपर्व! मथुराचे लोक कलाकार करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत, हजारो कोटींच्या प्रकल्पांचं करणार लोकार्पण

Last Updated : Dec 30, 2023, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.