ETV Bharat / state

जालना: शेतकऱ्यांचे अनुदान वाढवून घेण्यासाठी वंचितची निदर्शने

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान शासनाने जाहीर केले. हे अनुदान वाढवून हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावेत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
author img

By

Published : Nov 22, 2019, 8:04 PM IST

जालना - राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान शासनाने जाहीर केले. हे अनुदान वाढवून हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावेत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितची निदर्शने

राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी आठ हजारांची तर फळबागांसाठी अठरा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम वाढवून खरीप पिकासाठी हेक्‍टरी पंचवीस हजार आणि फळबागांसाठी पन्नास हजार इतकी करावी. जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. शेतकऱ्यांबरोबर शेतमजुरांनाही भरपाई व मोफत धान्य वाटप करण्यात यावे. वीज बिलात सूट आणि त्वरित पीक विमा देण्यात यावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा - नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्राचे दोन सदस्यीय पथक मराठवाडा दौऱ्यावर

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके, अॅड. अशोक खरात, विष्णु खरात, बाबासाहेब साळवे, विनोद भालेराव, भालचंद्र भोजने, विजयानंद शेळके हे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

Intro:दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान शासनाने जाहीर केले आहे हे अनुदान वाढवून हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Body:जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टी व वादळामुळे जिल्ह्यातील बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे .त्यामुळे राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतही जाहीर केली आहे, मात्र ही मदत अत्यंत तोकडी आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंतच्या खरीप पिकांसाठी आठ हजारांची तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची मदत जाहीर केले आहे. ही मदत वाढवून खरीप पिकासाठी हेक्‍टरी 25 हजार आणि फळबागांसाठी पन्नास हजार हेक्टरी एवढी मदत देण्यात यावी, जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांबरोबर शेतमजुरांना ही भरपाई व मोफत धान्य वाटप करण्यात यावे ,वीज बिलात सूट व पिक विमा त्वरित देण्यात यावा. या आणि अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. आजच्या या निदर्शनांमध्ये जिल्हाध्यक्ष दीपक डोके एड. अशोक खरात ,विष्णु खरात ,बाबासाहेब साळवे ,विनोद भालेराव, भालचंद्र भोजने, विजयानंद शेळके, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.