ETV Bharat / state

ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून दोन लहान मुलांचा मृत्यू, जालना जिल्ह्यातील घटना - Two children killed in jalna district

ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील आरतखेडा गावच्या परीसरात घडली आहे. चेतन धोत्रे (वय १२.) आणि गणेश निंबोळे (वय. १६.) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.

जालना जिल्ह्यात ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून दोन लहान मुलांचा मृत्यू

author img

By

Published : Aug 30, 2021, 10:05 PM IST

जालना - दगडांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील आरतखेडा गावच्या परीसरात घडली आहे. चेतन धोत्रे (वय १२.) आणि गणेश निंबोळे (वय. १६.) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. ही दोन्हीही मुले खदानीतून ट्रॅक्टरच्या माध्यमातून दगडांची वाहतूक करत होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.

ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून दोन लहान मुलांचा मृत्यू

ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

ट्रॅक्टर चालवताना गणेश निंबोळे यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. यामध्ये दोन्हीही मुले ट्रॉलीखाली दबली गेली. या दोन्हीही मुलांना परीसरातील नागरीकांनी तत्काळ जाफ्राबाद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केले. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.