ETV Bharat / state

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक : जालन्यात २५ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ जालना जिल्हा

औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्यातून पंचवीस हजार पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. नाव नोंदणी संदर्भातील प्रारूप मतदार यादी 23 नोव्हेंबरला  प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 9 डिसेंबरपर्यंत या यादीवर दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. अंतिम यादी 30 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 14, 2019, 10:30 AM IST

जालना- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्यातून पंचवीस हजार पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. मे-जूनमध्ये या निवडणुका होणार आहेत.

मतदारसंघाच्या नाव नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये जालना तालुक्यातील 7960, बदनापूरमधील 2035, भोकरदनमधील 3590, जाफराबादमधील 2317, परतुरमधील 2216, मंठ्यातील 1694, अंबडमधील 3416 आणि घनसावंगीमधील 2047 अशा एकूण 25005 पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. या नाव नोंदणी संदर्भातील प्रारूप मतदार यादी 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 9 डिसेंबरपर्यंत या यादीवर दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. अंतिम यादी 30 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हेही वाचा - बाजार समित्या बरखास्त करणे हे शेतकऱ्यांना 'कॉर्पोरेट'च्या दारात उभे करण्याचा घाट

दरम्यान, जालना जिल्ह्यात 2014 सली झालेल्या मतदानामध्ये 24 हजार 866 मतदारांची नोंदणी झाली होती तर, 53 मतदार केंद्रे उभारण्यात आली होती. यावर्षी मतदान केंद्रांमध्ये वाढ झाली असून 73 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये जालन्यात 19, बदनापूरमध्ये 6, भोकरदनमध्ये 12, जाफराबादमध्ये 6 ,परतुरमध्ये 7, मंठ्यात 5, अंबडमध्ये 10 आणि घनसावंगीत 8 मतदान केंद्र आहेत.

Intro:औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी सुरू असून मे- जून मध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यातून 25000 पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी केली आहे.

Body:महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नाव नोंदणी मध्ये प्राप्त झालेल्या अर्जामध्ये जालना तालुका 7960, बदनापूर 2035, भोकरदन 3590, जाफराबाद 2317, परतुर 2216, मंठा 1694, अंबड 3416, आणि घनसावंगी 2047 अशा एकूण पंचवीस हजार पाच पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. या नाव-नोंदणी संदर्भातील प्रारूप मतदार यादी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून नऊ डिसेंबर पर्यंत या यादीवर दावे व हरकती घेता येतील. अंतिम यादी 30 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
दरम्यान जालना जिल्ह्यात 2014 सली झालेल्या मतदानामध्ये 24 हजार 866 मतदारांची नोंदणी झाली होती. आणि 52 मतदान केंद्र होते .यावर्षी मतदान केंद्रांमध्ये वाढ झाली असून 73 मतदान केंद्रे आहेत.
या केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे जालना 19, बदनापूर 6, भोकरदन 12, जाफराबाद 6 ,परतुर 7, मंठा 5, अंबड 10, घनसावंगी 8 असे एकूण 73 मतदान केंद्र आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.